वॉशिंग्टन : स्पेसएक्सचे एलन मस्क यांची जगातील खासगी स्वरूपाचे पहिले स्पेसवॉक यशस्वीरित्या पार पाडणारी पोलारिस डॉन मोहीम यशस्वी झाली आहे. चौघे अंतराळवीर ड्रॅगन यानातून सुरक्षितरित्या पृथ्वीवर परतले आहेत.
ड्रॅगन स्पेसक्राफ्ट फ्लोरिडाच्या ड्राय टॉर्टुगास किनार्यावर पाण्यात उतरले. पोलारिस डॉन 10 सप्टेंबर रोजी फाल्कन-9 रॉकेटने प्रक्षेपित करण्यात आले होते. जेरेड आयझेकमॅन हे या मोहिमेचे प्रायोजक तसेच मिशन कमांडरही होते.
प्रत्यक्ष जमिनीवर उतरताना यानाचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट उघडण्यात आले. विशेष बोटीवर बचाव पथक आधीच हजर होते. अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून बाहेर पडण्यापूर्वी यानाची अंतिम तपासणी झाली.
मस्क यांच्या तीन मोहिमा नियोजित आहेत. ही पहिलीच मोहीम होती. पुढे स्टारशिप मोहीम लाँच केली जाईल. स्टारशिप हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे. त्याची सध्या चाचणी सुरू आहे.
36 संशोधने व प्रयोग अंतराळातील आरोग्यासंदर्भात या मोहिमेंतर्गत करण्यात आले.
700 कि . मी. अंतरावर (पृथ्वीपासून)आयझेकमॅन व सारा गिलीस यांनी स्पेसवॉक केला.
25,000 कि.मी. ताशी वेग स्पेसवॉकच्या वेळी पोलारिस डॉन यानाचा होता.
10 मिनिटे दोघांनी, आधी आयझेकमॅन नंतर सारा असा एकापाठोपाठ स्पेसवॉक केला.
27,000 कि.मी. ताशी वेग पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना यानाचा होता.
1,900 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान यानाच्या हवेशी घर्षणाने निर्माण झाले.
4 मीटर रुंद उष्णतारोधकाने (यानाखालील) अंतराळवीरांना या तापमानापासून सुरक्षित ठेवते.