अँजी स्टोन. File photo
आंतरराष्ट्रीय

ग्रॅमी नामांकित गायिका अँजी स्टोन यांचा अपघाती मृत्‍यू

मॉन्टगोमेरी शहराजवळ दुर्घटना, सात जखमी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क: ग्रॅमी-नामांकित आर अँड बी गायिका अँजी स्टोन यांचे शनिवारी (दि.१मार्च) सकाळी कार अपघातात निधन झाले. त्या ६३ वर्षांच्या होत्या. 'विश आय डिडन्ट मिस यू' या गीताने त्‍यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संगीत निर्माता आणि स्टोनचे व्यवस्थापक वॉल्टर मिल्सॅप यांनी 'असोसिएटेड प्रेस'ला सांगितले की, शनिवारी पहाटे चार वाजता अलाबामाहून अटलांटाला परत जाताना कारने ट्रकला धडक दिली. मॉन्टगोमेरी शहराजवळ ही दुर्घटना घडली. अँजी स्‍टोन यांचा मृत्‍यू झाला असून, अपघातातील सात जखमींना बॅप्टिस्ट मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्‍यात आले आहे.

आमच्‍यासाठी ही एक भयंकर प्रसंग आहे. भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नाहीत. नेमकं काय घडलं हे समजून घेण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न करत आहे, असे अँजी स्टोनची मुले डायमंड आणि मायकेल आर्चर यांनी एसआरजी ग्रुपने शेअर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT