Orange Party for Elephant दक्षिण आफ्रिकेतील झिंम्बाबे येथील आँरेज पार्टी हा सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. ही पार्टी दिली जाते हत्ती, काळवीट, माकडे असे अनेक प्राणी या पार्टीमध्ये संत्र्यांचा आस्वाद घेतात. झिम्बाब्बेमध्ये फळांचा हंगाम सुरु झाल्यानंतर ही ऑरेंज पार्टी आयोजित केली जाते. याचे आयोजन करणे म्हणजे मानव वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळणे, व अतिरिक्त किंवा बाजापेठेत नेण्यायोग्य नसलेली फळे प्राण्यांना खाऊ घालणे हा दुहेरी उद्देश साध्य होतो. नुकतीच ही Orange Party लिम्पोपो नदीच्या काठावर पार पडली.
कुठे होते ही पार्टी
दक्षिण झिम्बाब्वेमधील लिम्पोपो नदीच्या काठावर वसलेल्या 'नॉटिंगहॅम इस्टेट' येथे दरवर्षी या पार्टीचे आयोजन होते. या अनोख्या आणि मनमोहक उपक्रमाला जगभरात "ऑरेंज पार्टी" (Orange Party) म्हणून ओळखले जाते. संत्र्यांच्या तोडणी हंगामात स्थानिक वन्यजीवांसाठी, प्रामुख्याने हत्तींसाठी ही पार्टी आयोजित करण्यात येणारे येते वन्यजीवप्रेमींसह पर्यटकांसाठी ही पर्वणी असते. शेकडो हत्ती, माकडे या पार्टीला हजर असतात.
संत्र्यांचा हंगाम सुरू झाला की जंगलातील हत्तींचे कळप, बबून, काळवीट आणि इतर तृणभक्षी प्राणी नियमितपणे या ठिकाणी एकत्र येतात. एका वेळी अनेक टन संत्री प्राण्यांच्या समोर रिकामी केली जातात, ज्याचा आनंद प्राणी अगदी मनमुरादपणे लुटतात. पॅकिंग आणि निर्यातीच्या प्रक्रियेदरम्यान आकाराने लहान असलेली, किंचित डाग पडलेली किंवा बाजारात पाठवण्यासाठी अयोग्य ठरलेली अतिरिक्त संत्री फेकून न देता ती ट्रॅक्टरच्या मोठ्या ट्रॉलींमधून विशिष्ट मोकळ्या जागेत आणून टाकली जातात.
मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे
दुष्काळग्रस्त किंवा कोरड्या मोसमात पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात हत्ती अनेकदा मानवी वस्त्यांमध्ये किंवा शेतांमध्ये घुसून उभ्या पिकांचे नुकसान करतात. ही संत्री जंगलालगतच्या विशिष्ट भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्यामुळे हत्ती शेतात न शिरता शांततेने अन्न ग्रहण करतात, ज्यामुळे शेतकरी आणि वन्यजीवांमधील संघर्ष टळतो. बाजारात विक्रीस अयोग्य ठरलेली लाखो संत्री कचऱ्यात जाण्याऐवजी नैसर्गिक अन्नसाखळीत वापरली जातात. संत्र्यांमधील रस आणि शर्करा प्राण्यांना तीव्र उन्हाळ्यात हायड्रेशन आणि ऊर्जा पुरवण्यास मदत करते.
हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक नॉटिंगहॅम इस्टेटला भेट देतात. एकाच वेळी शेकडो हत्ती ट्रॅक्टरभोवती शांततेने उभे राहून संत्री फस्त करतानाचे दृश्य अत्यंत दुर्मिळ आणि विलोभनीय मानले जाते.