भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यामुळे युक्रेन संतप्त झाला आहे.  File Photo
आंतरराष्ट्रीय

सर्वांत मोठ्या लोकशाहीची गुन्हेगाराला मिठी : मोदींच्या रशिया भेटीवर झेलेन्स्की संतप्त

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर मोदी यांचा रशियाचा हा पहिलाच दौर आहे. पण दौऱ्यामुळे युक्रेन चांगलाच दुखावला आहे. युक्रेनेच राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी या भेटीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही भेट म्हणजे शांती प्रक्रियेला खीळ असल्याचे झेलेन्सकी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मास्कोपासून काही अंतरावर असलेल्या नोवो ओगरयोवो येथे ही भेट झाली. दरम्यान ही भेट सुरू असताना रशियाचे सैनिक युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला करत होते, आणि यात ३८ लोकांचा बळी गेला, असे CNNने म्हटले आहे.

  • शांतता प्रक्रिया खीळ बसल्याची युक्रेनची टीका

  • मोदींची दौरा सुरू असतानाच युक्रेनवर रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला

  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष जगातील सर्वांत मोठे गुन्हेगार असल्याची युक्रेनची टीका

  • भारतीय नागरिकांशी संवाद साधताना युक्रेनचा उल्लेख नाही

यावर व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक्स पोस्ट करत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. "ही भेट अतिशय निराशजनक आहे आणि शांतता प्रक्रियेसाठी या भेटीमुळे मोठा तडा गेलेला आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राचा नेता, जगातील सर्वांत मोठ्या गुन्हेगाराला मॉस्कोमध्ये मिठी मारत आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

मोदींनी रशियातील भारतीय नागरिकांशी संवाद साधला, पण यामध्ये युक्रेनसंदर्भात कोणताही उल्लेख त्यांनी केला नाही, असे CNNने म्हटले आहे. भारताने रशियात आणखी दोन दूतावास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रिपूर्ण संबंध फार जुने आहेत, भारत लष्करी शस्त्रांसाठी बऱ्याच अंशी रशियावर अवलंबून असतो. रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरू असताना भारताने रशियाकडून कच्चे खनिज तेल विकत घेणे सुरूच ठेवले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT