Yaniv Hayoun Flydubai flight जह्पोीग
आंतरराष्ट्रीय

Yaniv Hayoun Flydubai flight rescue: इस्त्रायलच्या एका प्लंबरने कोसळणाऱ्या विमानावर कसं मिळवलं नियंत्रण? वाचवले १७४ प्राण

प्लंबरने प्रसांगावधान राखून काही महत्वाचे निर्णय घेतले. या महत्वाच्या निर्णयांमुळेच आज १७४ प्रवाशांचे प्राण वाचल्याची भावना जगभरातील राजकीय नेते व्यक्त करत आहेत.

Anirudha Sankpal

Yaniv Hayoun Flydubai flight: फ्लाय दुबईची फ्लाईट दुबईहून तेल अवीवला जात असताना कॉकपिटमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. सह वैमानिकाने कमांडिंग पायलट असलेल्या स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडला गेला. अन् मदतीची हाक देण्यात आली. यावेळी विमानात असलेल्या एका प्लंबरने प्रसांगावधान राखून काही महत्वाचे निर्णय घेतले. या महत्वाच्या निर्णयांमुळेच आज १७४ प्रवाशांचे प्राण वाचल्याची भावना जगभरातील राजकीय नेते व्यक्त करत आहेत. या प्लंबरचे नाव आहे यानिव्ह हायुन!

प्लंबरने नेत्यान्याहूंना सांगितला सगळा घटनाक्रम

यानिव्हने को पायलटला बाजूला करण्यात आणि विमानाचा ताबा पुन्हा कमांडिग पायलटला मिळवून देण्याचे मोठे काम केले होते. मात्र एका प्लंबरला विमान कसं उडवायचं हे कसं माहिती होतं. अन् विमानाचे अत्यंत क्लिष्ट कंट्रोल्स त्याने कसे सांभाळले असा प्रश्न आपल्या मनात नक्कीच आले असतील. याबाबतचा खुलासा खुद्द यानिव्हनेच केला आहे.

यानिव्ह इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी बोलताना त्या वेळी काय झालं हे देखील सांगितलं. तो म्हणाला की, ती एक वाईट घटना होती. मात्र देवाचे आभार की आम्ही त्याला यशस्वी होऊ दिलं नाही. आम्ही त्याला (सह पायलट) जवळपास मारहाण केली. आम्ही मी आणि झिका, शोटा यांनी एक टीम म्हणून काम केलं. देवाचे आभार की आम्ही त्यात यशस्वी झालो. आम्हाला भीती होती. आम्हाला काही करून वाचायचं होतं. त्यामुळं आमच्या हातून ते झालं.

अचानक कॉकपिटचा दरवाजा उघडला अन्...

यानिव्हने नेमका घटनाक्रम सांगितला. तो म्हणाला, 'अचानक कॉकपिटचा दरवाजा अनलॉक झाला. आम्ही कसं तरी करून तो दरवाजा उडला. मी आणि माझ्यासोबत बहुदा एक क्रू मेंबर होता. आम्ही पाहिले की एक पायलट ज्याला भोसकण्यात आलं होतं तो दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला खाली पडला होता. मात्र त्यानं बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता.

त्यापूर्वी कोणीतरी ओरडलं. एक महिला स्टॅबिंग असं ओरडताना दिसली त्यावेळी आम्हाला कळालं की हल्ला झाला आहे. विमान खूप हेलकावे खात होतं. त्यानंतर मी कॉकपिटकडे धावलो. त्यावेळी विमान वेगाने खाली उतरत होते. आम्ही पळालो आणि त्या को पायलटला आम्ही ओढून बाहेर काढलं. तो विमान नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तो कंट्रोल्स नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता.

मी एअर क्रॅशचे टीव्ही शो पाहतो

आम्ही त्याला बाहेर काढल्यानंतर मी विमानाचा ताबा घेतला आणि विमानाचे स्टेअरिंग ओढू लागलो. मी खाली जाणारे विमान सरळ रेषेत आणले. मी टीव्ही शो पाहतो त्यात मला हे स्टेअरिंग ओढायचं असतं हे समजलं होतं. मी दोन्ही स्टेअरिंगवर कोणी नव्हत हे पाहून एक स्टेअरिंग ओढलं.

आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही सौदीत लँड करतोय. फ्लाईट अटेंडंटने सांगितलं की आपण सौदी अरेबियात लँड करतोय. मात्र याचा आम्हाला काही फरक पडत नव्हता आम्ही लँड करतोय हेत महत्वाचं होतं. यानिव्ह ज्यावेळी विमानातून खाली उतरला त्यावेळी तो रक्ताने माखला होता. मात्र ते रक्त त्याचे नव्हते तर त्या को पायलटचे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT