WWE सुपरस्‍टार केन झाला महापौर! 
आंतरराष्ट्रीय

WWE सुपरस्‍टार केन झाला महापौर!

अनुराधा कोरवी

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन : wwe सुपरस्‍टार केनला आपण आतापर्यंत रिंगमध्येच पाहिले असेल. परंतु आता तो अमेरिकेतील राजकारणाच्या रिंगमध्ये दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत केन उर्फ ग्‍लेन जॅकब्‍स अमेरिकेतील नॉक्‍स काऊंटीच्या महापौरपदी निवडून आला आहे.

केनने ही निवडणूक रिपब्‍लिकन पक्षाकडून लढविली होती. तो रिपब्‍लिकन पार्टीचा सदस्य आहे. त्याने आपले प्रतिस्‍पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाचे लिंडा हेनी यांच्यावर विजय मिळविला. केनला ६६ टक्‍के मते मिळाली. या विजयानंतर wweने आपल्या अधिकृत ट्‍विटर अकाऊंटवरून या विजयाची घोषणा केली.

दरम्यान, गेल्यावर्षांपासून केन टीव्‍हीवर खूप कमी दिसत होता. कारण तो निवडणुकीच्या तयारीत व्यस्‍त होता. गेल्या काही काळापासून केन राजकारणात सक्रीय असून wwe मध्ये खेळतानाही त्याचे राजकारणाकडे लक्ष होते.

केनविषयी…

आपल्या जिगरबाज खेळीने केनने wwe मध्ये आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ६ फूट ८ इंच उंची असणार्‍या केनने १९९५ मध्ये wwe मध्ये पदार्पण केले. त्यानंतर प्रदीर्घ काळ तो चॅम्‍पियन होता. लाल रंगाचा मास्‍क घालून तो रिंगमध्ये उतरायचा. तसेच तो माजी हेविवेट चॅम्‍पियनही आहे.

wwe मध्ये अंडरटेकर आणि केन या बंधूंची जोडी खूप लोकप्रिय आहे. एवढेच नाहीतर wwe च्या इतिहासा त्यांच्यात झालेला सामनाही सर्वाधिक चर्चित सामन्यांपैकी एक आहे. आता महापौर झाल्यानंतर केन लवकर wwe खेळताना दिसणार नाही. परंतु संधी मिळताच रिंगमध्ये उतरणार असल्याचे केनने सांगितले.

ग्‍लेन जॅकब्‍स गेल्या २० वर्षांपासून टेनिसीमध्ये राहतो. पत्‍नीसह तो त्या ठिकाणी एक स्‍थानिक विमा कंपनी आणि रियल इस्‍टेट कंपनी चालवतो.

अमेरिकेत मेयर बनणारा wwe तील दुसरा खेळाडू

केन अमेरिकेन महापौर पदापर्यंत पोहोचणारा दुसरा wwe खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९९१-१९९५ या काळात जेस वेंचुरा हे ब्रूकलिन पार्कचे महापौर होते. त्यानंतर ते १९९९-२००३ या काळात तेथील गव्‍हर्नरही बनले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT