आंतरराष्ट्रीय

‘ती’ संगीतावर करत होती एरोबिक्स; पाठीमागे लष्‍कराने केला म्‍यानमारच्या संसदेवर कब्‍जा

Pudhari News

रंगून : पुढारी ऑनलाईन 

म्‍यानमारमध्ये सैन्याने पुन्हा एकदा सत्‍ता आपल्‍या ताब्‍यात घेतली आहे. प्रमुख नेत्‍या आंग सान सू की यांना ताब्‍यात घेण्यात आले. म्‍यानमारच्या लष्‍कराकडून जेव्हा देशात सत्‍तापालट केला जात होता, त्‍यावेळी एक लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या लाईव्ह व्हिडिओमध्ये एक महिला म्‍यानमार संसदेच्या समोर एरोबिक्‍स क्‍लास करत होती. त्‍याचवेळी तिच्या पाठीमागे लष्‍कराकडून संसदेवर कब्‍जा करण्याची हालचाल सुरू होती. (woman conducted her aerobics class in myanmar without realizing coup was taking place)

अधिक वाचा : म्यानमारमध्ये लष्कराचे बंड, का झाली सत्तापालट?

ट्विटरवर शेअर झालेला हा व्हिडिआ आतापर्यंत ८० लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. हा व्हिडिओ ३६ हजार पेक्षा अधिक वेळा ट्विट केला आहे. तर लाखो लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, एक महिला जोरदार संगीतावर ॲरोबिक्‍स करत आहे. त्‍याचवेळी तिच्या पाठीमागे अनेक वाहनांचा ताफा जात असून, संसदेवर कब्‍जा करण्यात येत आहे. हे सर्व होत असताना ही महिला मात्र गाण्याच्या ठेक्‍यावर एरोबिक्‍स करण्यात दंग होती. तिला माहितच नव्हते तीच्या पाठीमागे देशाची संसद लष्‍कराने आपल्‍या ताब्‍यात घेतली आहे. या महिलेचे नाव खिंग हनिन वेई असल्‍याचे म्‍हटलं जात आहे. ती एक शारीरिक शिक्षणाची शिक्षिका असल्‍याचे समोर येत आहे. 

आंग सान सू समवेत अनेक नेत्‍यांना ताब्‍यात घेण्यात आले आहे…

म्‍यानमारच्या सैन्याने काल (सोमवार) सत्‍तापालट केली. यावेळी देशाच्या मुख्य नेत्‍या आंग सान सू ची यांच्यासमवेत अनेक वरिष्‍ठ नेत्‍यांना ताब्‍यात घेतले आहे. लोकशाहीच्या दिशेने पुढे जात असलेल्‍या या दक्षिण पूर्व आशियातील या राष्‍ट्राचा या घटनेमुळे उलट प्रवास सुरू झाला आहे. पाच दशकापर्यंत लष्‍कराच्या ताब्‍यात राहिलेल्‍या या देशात घडलेल्‍या या प्रकाराममुळे जगभरातील अनेक देशांनी आणि संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली असून, ताब्‍यात घेतलेल्‍या नेत्‍यांना सोडण्याची मागणी करण्यात येत आहे. 

अधिक वाचा : सत्तांतरामुळे म्यानमारवर बंधने लादण्याचा जो बायडेन यांचा इशारा  

सैन्याच्या अधिपत्‍याखालील 'मयावाडी टीव्ही' ने काल (सोमवार) सकाळी एक घोषणा केली की, सैन्य प्रमुख जनरल मिन आंग लाइंग यांनी एक वर्षासाठी देशाचे नियंत्रण आपल्‍या हातात घेतले आहे. या घोषणेसाठी लष्‍कराने तयार केलेल्‍या संविधानाचा हवाला देण्यात आला आहे. ज्‍यानुसार राष्‍ट्रीय आपत्‍कालीन परिस्‍थित देशाचे नियंत्रण लष्‍कराला आपल्‍या ताब्‍यात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्‍या वर्षी नोव्हेंबर महिण्यात मतदानामध्ये धोकेबाजीच्या लष्‍कराच्या दाव्यावर कोणतीही पावले न उचलने. कोरोना महामारीच्या संकटातही निवडणुका स्‍थगित न करण्याला सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT