Gadi Eisenkot | आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळणार? 
आंतरराष्ट्रीय

Gadi Eisenkot | आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळणार?

इस्रायलमध्ये विरोधकांची हरेदी पक्षांशी चर्चेस तयारी

पुढारी वृत्तसेवा

जेरुसलेम; वृत्तसंस्था : इस्रायलमध्ये निवडणुकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, नवीन सरकार स्थापन्यासाठी हालचालींना वेग आला आहे. इस्रायलचे अध्यक्ष इसाक हर्झोग यांनी विविध पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा पूर्ण केली असून, माजी लष्करप्रमुख आणि विरोधी पक्षाचे नेते गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण रविवारी देण्याची शक्यता आहे. त्यांना ६७ खासदारांचा पाठिंबा आहे.

विरोधी पक्षांनी हरेदी (अतिऑर्थोडॉक्स ज्यू) पक्षांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायल बेतेनू पक्षाचे प्रमुख अविग्दोर लिबरमन यांनी हरेदी पक्षांना सरकारमध्ये सहभागी करून घेण्याबाबतचा विरोध मागे घेतल्याचे वृत्त आहे. तसेच हरेदी समाजातील तरुणांच्या लष्करी भरतीच्या मुद्द्यावर लवचीक भूमिका स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. युनायटेड तोरा ज्युडाइझम पक्षाचे प्रतिनिधी अव्राहम युस्टमन यांनी स्पष्ट केले की, हरेदी समाजाच्या लष्करी भरतीसंदर्भात समाधानकारक तोडग्याची तयारी दाखवणाऱ्या पक्षाशी चर्चा करण्यास त्यांचा पक्ष तयार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT