पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत सत्तांतर झालं. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यही झालं. यानंतर खर्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एलन मस्क हे अमेरिकेत विशेष चर्चेत आहेत. आता त्यांनी शेकडो मुले असलेल्या मंगोल चंगेज खान याचा फॅन (चाहता) का आहोत त्याचा स्वतः खुलासा केला आहे. चंगेज खानप्रमाणेच एलोन मस्कही अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत.
चंगेज खान हा १३ व्या शतकातील मंगोल वंशाचा राजा होता. त्याने पृथ्वीपासून अवकाशापर्यंत सारं काही जिंकण्याचा त्याचे स्वप्न होते. मस्क यांनाही असेच सारं काही जिंकण्याची आस आहे. तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मस्क यांना शेकडो मुलांचे वडील असलेल्या चंगेज खानप्रमाणेच जास्तीत जास्त मुले जन्मांच्या घालावती याचे समर्थनही करत आहेत.
आता त्यांनी शेकडो मुले असलेल्या मंगोल चंगेज खान याचा फॅन (चाहता) का आहोत त्याचा स्वतः खुलासा केला आहे. एकल मस्क हे १२ मुलांचे वडील आहे. त्यांचा सर्वात धाकटा मुलगा पाच महिन्यांचा आहे. मी मस्क यांच्या मुलाची आई आहे, असा दावा नुकताचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अॅशले सेंट क्लेअर हिने केला आहे. यावर मस्क यांनी थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.
मस्क यांच्या पोस्टनंतर साेशल मीडियावर मस्क आणि चंगेज खान यांच्यात तुलना करणारे मीम्स भरले. एका युजरने म्हटलं आहे की, "५०० वर्षांनंतर, मानवजातीच्या जीन पूलमधील सर्वात जास्त ओळखले जाणारे दोन पूर्वज चंगेज खान आणि एलन मस्क असतील." तर एका युजरने म्हटलं ओ की, मस्क हा चंगेज खानचा पुनर्जन्म आहे ही चर्चा पुन्हा पाहायला मला आवडेल."