पुढारी ऑनलाईन डेस्क
माणसांचं लैंगिक विश्व अधिक व्यापक झालंय. पूर्वीच्या तुलनेत माणूस सेक्सविषयी अधिक प्रगल्भ आणि मुक्त होताना दिसत आहे. कारण, मागील ४० वर्षांच्या काळात आपल्या आयुष्यात तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. गर्भनिरोधक गोळी, ग्रिन्डर, टिन्डर यासारख्या अॅप्सनी माणसाच्या लैंगिक जीवनात नवी क्रांतीच आणली आहे. यामध्ये समलैंगिकता. घटस्फोट, लग्नाआधीचे लैंगिक संबंध, बहुपत्नीत्व अशा नव्या कल्पनांनी सामाजिक रुढींमध्ये बदल केलेला आहे. इतकं सगळं बदललं तरी, संशोधन असं सांगतं की, माणसांची सेक्स करण्याची इच्छा कमी झालेली आहे.
अमेरिकेमध्ये झालेल्या संशोधनात सांगितलं आहे की, १९९० च्या तुलनेत २०१० मध्ये माणसांचा सेक्स करण्याची इच्छा ही १५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. थोडक्यात काय, तर माणूस वर्षांतून ६२ वेळा सेक्स करायचा आणि आता तो ५३ वेळाच सेक्स करतो आहे. समाजाच्या सर्व स्तरातील वर्गांमध्ये हा महत्त्वाचा बदल झालेला दिसून आलेला आहे. संशोधनं असं सांगतात की, २०१३ मध्ये १६ ते ४४ वर्षांच्या ब्रिटीश लोकांनी महिन्यातून केवळ ५ वेळा सेक्स केला. जपानमध्ये सर्वात भयंकर स्थिती आहे, तिथे ४६ टक्के महिला आणि २५ टक्के पुरुष चक्क सेक्सचा तिरस्कार करतात.
लोकांची सेक्समधील रुची कमी का होत आहे?
पाॅर्न ब्लेम : माणसांची सेक्सबद्दलची रुची कमी होण्यात तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे एक कारण आहे. त्यामध्ये ऑनलाईन पाॅर्नोग्राफी आणि सोशल मीडिया यांचा समावेश होतो. लोकांच्या ऑनलाईन पाॅर्नोग्राफी पाहण्याच्या सवयीवर संशोधकांनी लक्ष केंद्रीत केलं. मात्र, काही जणांकडून ही एक मनोविकृती असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्ष संभोगाला नवा पर्याय म्हणून पाॅर्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे जोडीदारासोबत असलेल्या संभोगावर मर्यादा आलेल्या आहेत, असाही युक्तीवाद केला जात आहे.
पाॅर्न व्हिडीओमुळे प्रत्यक्ष सेक्सवेळी पुरुष होतात हताश
लोकांची सेक्समधील रुची कमी होण्यामागे 'पाॅर्न व्हिडीओमध्ये अवास्तव संभोग दाखविला जाणं' हे कारण आहे, असं संशोधकांनी सांगितलं आहे. २०११ मध्ये इटलीत पाॅर्न व्हिडीओ पाहणार्या २८ हजार लोक अभ्यास केला असता लक्षात आले की, जास्तीत जास्त लोक हे पाॅर्न साईट व्हिडीओ पाहण्यात गुंतलेले असतात. संशोधक कार्लो फाॅरेस्टा म्हणतात की, पाॅर्न व्हिडीओमध्ये सेक्सच्या हिंसक कृती दाखविल्या जातात. त्या अवास्तव कृती पुरुषांना प्रभावी वाटतात, त्यामुळे बेडरुममध्ये प्रत्यक्ष सेक्स करताना पुरुष हताश होऊन जातो.
पाॅर्न आणि विवाहाचा दर : २०१४ मध्ये मायकेल मॅलकोल्म आणि जाॅर्ज नाॅफल यांनी १५०० अमेरिकन लोकांचा अभ्यास केला. त्यात १८ ते ३५ वयाच्या लोकांनी किती इंटरनेटचा वापर केला आणि त्याचा या लोकांच्या लैंगिक जीवनावर काय परिणाम झाला, याचा अभ्यास केला. अभ्यासाच्या निष्कर्षात असं समोर आलं की, जिथं विवाहाचा दर कमी आहे, तिथं इंटरनेटचा वापर जास्त केला आहे. नियमितपणे ऑनलाईन पाॅर्नोग्राफी व्हिडीओ पाहणार्या पुरुषांसाठी हा मुद्दा महत्वाचा आहे.
सोशल मीडिया : माणसांची सेक्समधील इच्छा कमी होण्यामागे केवळ पाॅर्नोग्राफीच कारणीभूत ठरत आहे, असंही नाही. त्यात सोशल मीडियादेखील महत्वाचं कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे. लोकांना सेक्स करण्यापेक्षा सोशल मीडियावर व्यस्त राहणं महत्वाचं वाटू लागलं आहे. संशोधनात हे सिद्ध झालं होतं की, बेडरुमध्ये टीव्ही असल्यामुळे जोडप्यांची लैंगिक इच्छा कमी होत जाते. सहाजिक माणसाच्या लैंगिक आयुष्यात सोशल मीडियाचा अतिवापर नक्कीच परिणाम करत असेल, असं लक्षात येईल.
पाॅर्न आणि सोशल मीडियामुळे सेक्स वाढतो?
आता असंही संशोधनातून सांगितलं गेलंय की, आठवड्यातून दोनवेळा किमान ४० मिनिटं पाॅर्न व्हिडीओ पाहिले तर, माणसांमध्ये सेक्स करण्याची इच्छा बळावते. यासदंर्भात २८० लोकांवर अभ्यास केला. त्या अभ्यासात पाॅर्न पाहणार्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा वाढल्याचे दिसून आले. ट्वेन्ज, शर्मन आणि वेल्स यांनी या संशोधनात नमूद केलं होतं की, पाॅर्नोग्राफीमुळे लोकांची सेक्ससंबंधीची इच्छा कमी होत नाही. तर उलट ती जास्त तीव्र होते.
सोशल मीडिया हा माणसांचा सेक्स कमी करण्यास कारणीभूत असल्याचे सांगितलं जातं. पण, संशोधनात असंही आढळून आलं आहे की, सोशल मीडियामुळे लोकांचा लैंगिक भावना जागृत होतात. ग्रिन्डर आणि टिन्डरसारखे अॅप्सने माणसांच्या लैंगिकतेची म्हणजे संभोग करण्याची गती वाढू शकते. इतकंच नाही, नियमितपणे माणूस सेक्स करू शकतो, असंदेखील संशोधन सांगतं. त्यामुळे तंत्रज्ञानाने माणसांच्या आयुष्यात प्रमाणापेक्षा जास्त अतिक्रमण केलं असलं तरी, माणसाचा सेक्स कमी होण्याचा दोष तंत्रज्ञानाला देऊ शकत नाही.
ऑफिसमधील कामाचा सेक्सच्या इच्छेवर परिणाम होतो का?
लोकांची सेक्स करण्याची इच्छा कमी होण्यामागे ऑफिसमधील काम किंवा नोकरी हेदेखील एक कारण आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, अमोरिकेतील नोकरदार वर्ग हा सरासरी पूर्णवेळ म्हणजे आठवड्यातील ४८ तास काम करत असल्यामुळे थकवा निर्माण होतो. त्याचा परिणाम, त्याच्या लैंगिक आयुष्यावर होतो. त्यामुळेही लैंगिक इच्छा कमी होतात, असाही तर्कसंगत निष्कर्ष काढलेला आहे. पण, जॅनेट हायड, जाॅन डेलामीटर आणि एरी हेव्हिट यांच्या १९९८ साली प्रकाशित केलेल्या संशोधनात असं म्हंटलं की, गृहणी असणार्या किंवा नोकरी करणार्या महिलांमध्ये कामाचा कोणताही परिणाम त्यांच्या लैंगिक इच्छांवर होत नाही. उलट त्या इच्छा जास्त तीव्र होतात.
या निष्कर्षाचा अर्थ असा होत नाही की, कामाच्या ताणाचा परिणाम लैंगिक इच्छेवर होत नाही. ऑफिसमधील किंवा इतर कोणतं काम संबंधित व्यक्तीचं समाधान करतं का, यावरही बरंच अवलंबून आहे. एखादी वाईट नोकरी मिळणे, नोकरी नसण्यापेक्षाही बरं असतं. कारण, त्याचा मानसिक परिणाम जास्त होतो. सहाजिक लैंगिक जीवनातही त्याचा परिणाम होतो. थोडक्यात काय, तर कामाचा वाढता ताण माणसाच्या लैंगिक इच्छेवर नकारात्मक परिणाम करणार्या ठरतात, हे संशाोधनात स्पष्ट झाले आहे.
आधुनिक जीवनशैलीचा सेक्सच्या इच्छेवर परिणाम होतो का?
आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यामध्ये होणारे बदल आपल्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकतात. ट्वेन्ज, शर्मन आणि वेल्स असं सांगतात की, सेक्सची इच्छा कमी होण्याला सततचं वाढणारं दुःख किंवा असमाधानीपणा मुख्य कारण आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक रोग वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यात नेहमी उदास वाटणं किंवा चिंताग्रस्त असणं, हे सेक्सच्या इच्छेवर परिणाम करतात. चिंताग्रस्ततेची लक्षणं आणि लैंगिक इच्छा यांचा घट्ट संबंध आहे.
मानसिक साथीच्या रोगांचा संबंध हा आधुनिक जीवनशैलीशी जोडते. विशेष करून तरुण पिढीशी जास्त जोडते. संशोधनात या पिढीतच सेक्सची इच्छा कमी झाल्याचे दिसून आले आहे. ट्वेन्जच्या संशोधनात नोकरी, घरांची असुरक्षितता, हवामान बदलाची भीती, जातीयता, सामाजिक जीवन, हे सगळे मुद्दे आताच्या पिढीच्या मानसिक आरोग्याशी जोडले गेलेले आहे. त्यामुळे पिढ्यामध्ये लैंगिक इच्छेसंदर्भात भिन्नत्व आढळून येते.
माणसाच्या आयुष्यात सेक्स खूप महत्वाचा भाग आहे. कारण, सेक्सने आनंद निर्माण होतो. आपण निरोगी राहतो. इतकंच नाही तर आपल्या कामावरही आपण अधिकाधिक समाधानी राहतो. बहुतेच लोकांसाठी सेक्स ही गोष्ट मजेदार आहे. सेक्समधील इच्छा कमी होणं, ही जपानसाठी मोठी डोकेदुखी झालेली आहे. त्यामुळे जपानमध्ये मूल व्हावं यासाठी रोख रक्कम दिली जाते. कित्येक कंपन्यांना असं सांगितलं जातं की, कर्मचार्यांना आपल्या फॅमिलीसोबत जास्त वेळ देता यावा यासाठी कामाचे तास कमी करावेत. तेथील कंपन्यांनी या नियमाची अंमलबजावणीही केली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने तर 'बेबी बोनस' पालकांना प्रदान करते.
माणसांच्या आयुष्यातील सेक्सबद्दलची इच्छा कमी होणे, ही जशी मोठी समस्या आहे. त्याच पद्धतीने त्याचे उपायदेखील मोठेच असले पाहिजेत. मानसिक आरोग्यचं संकट हे सेक्सबद्दलची इच्छा कमी होण्यामागे मूळ कारण आहे. नोकरी, घरांची असुरक्षितता, हवामानातील बदल, सामाजिक मूल्यांचा र्हास या समस्या निकालात काढल्या की माणसांचं लैंगिक जीवन सुखकर होईलत. पण, त्याचबरोबर सामाजिक आरोग्यही निरोगी राहण्यास मदत होणार आहे.