Gavi girlfriend file photo
आंतरराष्ट्रीय

Gavi Princess Leonor relationship | स्टार फुटबॉलपटूच्या प्रेमात पडली राजकुमारी, त्यानं दिला नकार; कारणीभूत ठरली २२ वर्षांची सर्वसामान्य घरातली तरुणी

Who is Gavi’s girlfriend? राजघराण्यातील एक सुंदर राजकुमारी. राजसिंहासनाची वारसदार. ती एका खेळाडूच्या प्रेमात पडली. पण त्याने तिचे प्रेम नाकारले. कोण आहे राजकुमारी आणि तो फुटबॉलपटू, का दिला नकार?

मोहन कारंडे

Gavi Princess Leonor relationship |

स्पेन : राजघराण्यातील एक सुंदर राजकुमारी. राजसिंहासनाची वारसदार. ती एका खेळाडूच्या प्रेमात पडली. पण त्याने तिचे प्रेम नाकारले. भविष्यात त्याला राजा होण्याची संधी होती, पण त्याने त्याच्या प्रेयसीसाठी राजकुमारीला नकार दिला. एक राजकुमारी आणि तीही अत्यंत सुंदर, तिच्या प्रेमाला कोणी नाकारू शकेल हे फार दुर्मिळ आहे. ती राजकुमारी स्पेनची राजकन्या लिओनोर आहे आणि खेळाडू बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू पाब्लो गावी आहे. गावीने ज्या गर्लफ्रेंडसाठी राजकुमारीला नाकारलं, ती मुलगी कोण आहे माहीत आहे का?

Princess Leonor

कोण आहे राजकुमारी लिओनोर ?

राजकुमारी लिओनोर ही स्पेनचा राजा फेलिप सहावा आणि राणी लेटिझिया यांची मोठी मुलगी आहे. स्पेनच्या सिंहासनाची वारसदार म्हणून, तिला अस्टुरियसची राजकुमारी ही पदवी आहे. तिचा जन्म ३१ ऑक्टोबर २००५ रोजी झाला. इतकी सुंदर की बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या सुंदरीही तिच्यासमोर मागे पडतील. उच्च शिक्षित, राजेशाही थाटमाट आणि वैभव, आदर, संपत्ती, सर्वकाही...; असे म्हटले जाते की तिला तिचे खासगी आयुष्य लोकांना सांगायला किंवा व्यक्त करायला आवडत नाही. म्हणूनच तिच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. लिओनोरने वेल्समधील यूडब्ल्यूसी अटलांटिक कॉलेजसह विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतले आहे. सध्या ती स्पेनच्या जनरल मिलिटरी अकादमी आणि नेव्हल मिलिटरी अकादमीमध्ये लष्करी प्रशिक्षण घेत आहे.

कोण आहे पाब्लो गावी?

गावी हा एक स्पॅनिश स्टार फुटबॉलपटू आहे. त्याचे पूर्ण नाव पाब्लो मार्टिन पेझ गावी आहे. तो ला लीगा क्लब बार्सिलोना आणि स्पॅनिश राष्ट्रीय संघासाठी सेंट्रल मिडफिल्डर म्हणून खेळतो. २०२२ मध्ये, त्याने कोपा ट्रॉफीमध्ये गोल्डन बॉय पुरस्कार जिंकला. त्याचा जन्म ५ ऑगस्ट २००४ रोजी झाला, म्हणजेच तो राजकुमारी लिओनोरपेक्षा सुमारे एक वर्ष मोठा आहे.

फिफा विश्वचषकादरम्यान राजकुमारीला फुटबॉलपटूवर झालं प्रेम

२०२२ च्या फिफा विश्वचषकादरम्यान राजकुमारी लिओनोर फुटबॉलपटू गवीच्या प्रेमात पडली. स्पेनने कोस्टा रिकाचा ७-० असा पराभव केला. त्यानंतर, अशी अफवा पसरली की राजा फिलिप सहावा यांनी फुटबॉलपटू गवीला त्यांच्या मुलीसाठी स्वाक्षरी असलेली जर्सी देण्याची विनंती केली होती. तेव्हापासून लिओनोर आणि गवी यांच्यातील नात्याबद्दलच्या अफवा पसरू लागल्या. स्पेनने २०२४ चा युरो कप जिंकल्यानंतर अफवांना अधिकच वेग आला. राजघराण्याने राष्ट्रीय फुटबॉल संघाला राजवाड्यात आमंत्रित केले होते. तिथे राजकुमारी लिओनोर आणि गावी काही काळ हात धरून बसल्याचे फोटो व्हायरल झाले होते.

'या' मुलीसाठी राजकुमारीला दिला नकार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमारी लिओनोर गावीला डेट करू इच्छित होती, परंतु गावीने हा प्रस्ताव नाकारला. कारण तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो. गवीचा एका मुलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तो सार्वजनिक ठिकाणी एका मुलीला मिठी मारताना आणि चुंबन घेताना दिसत होता. ती गावीची प्रेयसी आहे. तिचे नाव अना पेलायो आहे. ती २२ वर्षांची असून विद्यार्थिनी आहे. तिचे इंस्टाग्रामवर ३.२५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT