आंतरराष्ट्रीय

रईसींचा अपघाती मृत्‍यू, इराणच्‍या राष्ट्राध्यक्षपदी कोण होणार विराजमान?

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतील, असे वृत्त 'तेहरान टाइम्स'ने दिले आहे.

इराणची राज्‍य घटना काय सांगते?

इराणने १९७९ मध्‍ये स्वीकारल्या गेलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या राज्यघटनेच्‍या पहिल्या आवृत्तीच्या कलम 130 आणि 131 नुसार, "देशाचा राष्ट्राध्यक्ष बडतर्फी, राजीनामा, अनुपस्थिती, आजारपणामुळे आपली कायदेशीर कर्तव्ये पार पाडू शकत नसेल किंवा मृत्यू झाला तर उपराष्ट्रपती आपले कर्तव्य बजावतील. इस्लामिक क्रांतीच्या नेत्याची मान्यता मिळाल्यानंतर राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या जबाबदाऱ्या पहिल्या उपराष्ट्रपतीकडे हस्तांतरित केल्या जातील. तसेच यानंतर ५० दिवसांमध्‍ये नवीन राष्‍ट्रपती निवडणूक होईल." या कायद्‍यानुसार आता इराणचे उपराष्‍ट्रपती मोहम्मद मोखबर हे राष्‍ट्राध्‍यक्षपदी विराजमान होणार आहेत.

कोण आहेत मोहम्मद मोखबर ?

मोखबर यांचा जन्‍म १ सप्टेंबर १९५५ रोजी झाला. ते राईसी यांच्याप्रमाणेच इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या जवळचे मानले जातात.२०२१ मध्ये इब्राहिम रईसी राष्ट्रपतीपदी निवडून आल्यानंतर मोखबर हे देशाचे पहिले उपराष्ट्रपती झाले हाेते. ऑक्टोबरमध्ये मॉस्कोला भेट देणाऱ्या समितीमध्‍ये त्‍यांचा सहभाग ते सिना बँकेच्या बोर्डाचे अध्यक्ष आणि खुजेस्तान प्रांताचे डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांच्याकडे दोन डॉक्टरेट पदव्या आहेत. मात्र, अयातुल्ला अली खमेनी यांच्या मंजुरीनंतरच त्यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे.

राष्‍ट्राध्‍यक्षांचा हेलिकॉप्‍टर अपघातात मृत्‍यू

इराणचे राष्ट्राध्यक्ष राईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुलाहियानी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पूर्व अझरबैजान प्रांतातील घनदाट जंगलात कोसळले. हेलिकॉप्टरच्या प्रवाशांमध्ये श्री रायसी, श्री अब्दुल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमाती आणि पूर्व अझरबैजान प्रांतातील इस्लामिक क्रांतीच्या नेत्याचे प्रतिनिधी अयातुल्ला मोहम्मद अली अले-हाशेम आणि इतर अनेकांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्ष रायसी रविवारी पहाटे पूर्व अझरबैजान प्रांतात गेले होते, जेथे त्यांनी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन केले. कार्यक्रम आटोपून परतत असताना परिसरात दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्‍याचे सरकारी सूत्रांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT