Who Is Kimberly Powell Pudhari
आंतरराष्ट्रीय

Jensen Huang Affair: Nvidiaचे CEO जेनसन हुआंग यांचं दुसरं अफेअर उघड? कोण आहे 'ती' महिला? कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनीच फोडलं बिंग

Who Is Kimberly Powell: Nvidia चे CEO जेनसन हुआंग आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी किम्बर्ली पॉवेल यांच्या कथित संबंधांबाबत The New York Times च्या वृत्तामुळे चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Shelke

Who Is Kimberly Powell: Nvidia या जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनीचे सीईओ जेनसन हुआंग सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या आणि एका चिनी व्यावसायिक महिलेच्या कथित संबंधांच्या बातमीनंतर आता कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किम्बर्ली पॉवेल यांचे नावही या प्रकरणाशी जोडले जात आहे.

The New York Times ने प्रसिद्ध केलेल्या नव्या वृत्तामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे. त्यामुळे किम्बर्ली पॉवेल नेमक्या कोण आहेत, Nvidia मध्ये त्या काय काम करतात आणि त्यांचे नाव या प्रकरणात का चर्चेत आले आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोण आहेत किम्बर्ली पॉवेल?

किम्बर्ली पॉवेल या Nvidia कंपनीच्या उपाध्यक्ष (Vice President) आहेत. त्या कंपनीचा हेल्थकेअर व्यवसाय सांभाळतात. 2008 पासून त्या Nvidia मध्ये कार्यरत आहेत. म्हणजेच त्यांना कंपनीत काम करण्याचा जवळपास 18 वर्षांचा अनुभव आहे.

त्यांनी Northeastern University मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. Nvidia मध्ये येण्यापूर्वी त्यांनी Planar Systems या कंपनीत काम केले. तिथे त्या मेडिकल इमेजिंगशी संबंधित उपकरणांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनाच्या कामात सहभागी होत्या.

2008 मध्ये Nvidia मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी मेडिकल इमेजिंगसाठी कंपनीच्या GPU तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर काम केले. पुढे त्यांनी कंपनीच्या संशोधन आणि AI क्षेत्रातील विविध उपक्रमांचे नेतृत्व केले. 2016 मध्ये त्या AI Business Development च्या वरिष्ठ संचालक झाल्या. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्याकडे हेल्थकेअर व्यवसायाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

Nvidia मध्ये नेमके काय काम करतात?

सध्या वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. MRI, CT स्कॅन, औषध संशोधन आणि जनुकीय माहितीचे विश्लेषण अशा अनेक कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते. Nvidia या क्षेत्रात GPU आणि AI आधारित सॉफ्टवेअर उपलब्ध करून देते. किम्बर्ली पॉवेल यांच्याकडे या संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी BioNeMo, MONAI आणि Parabricks यांसारख्या तंत्रज्ञानावर काम करते. यांचा उपयोग औषधांचा शोध घेणे, मेडिकल इमेजचे विश्लेषण करणे आणि जनुकीय माहितीवर प्रक्रिया करणे यासाठी होतो. त्यामुळे Nvidia च्या हेल्थकेअर व्यवसायात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

जेनसन हुआंग यांच्याशी कथित संबंधांची चर्चा का?

The New York Times ने 11 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात जेनसन हुआंग आणि किम्बर्ली पॉवेल यांच्यात कथित खासगी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. या वृत्तासाठी Nvidia मध्ये पूर्वी काम केलेल्या पाच कर्मचाऱ्यांच्या माहितीचा आधार घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रिपोर्टनुसार, कंपनीतील पदाच्या दृष्टीने किम्बर्ली पॉवेल या जेनसन हुआंग यांना रिपोर्ट करत होत्या. तसेच मार्च महिन्यात सॅन होजे येथे झालेल्या Nvidia च्या एका कार्यक्रमादरम्यान दोघेही सोबत राहत असल्याचे काही सूत्रांनी सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे.

या वृत्तावर जेनसन हुआंग यांनी थेट भाष्य करण्यास नकार दिला. Nvidia कंपनीकडूनही तत्काळ कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. किम्बर्ली पॉवेल यांच्याकडूनही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे सध्या हे प्रकरण केवळ माध्यमांतील दावे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT