आंतरराष्ट्रीय

‘व्हॉटस्‌ॲप’वरून मेसेज फॉरवर्ड करण्यावर आता जगभरात मर्यादा  

Pudhari News

सॅन फ्रान्सिस्को : पुढारी ऑनलाईन

फेक न्यूज आणि अफवांना रोखण्यासाठी 'व्हॉटस्‌ॲप'ने जुलै २०१८ मध्ये भारतीय यूजर्सना एकावेळी पाचपेक्षा जास्त लोकांना मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातली होती. आता सहा महिन्यांत यूजर्सकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर 'व्हॉटस्‌ॲप'ने जगभरातील यूजर्सवर ही मर्यादा लागू केली आहे. यामुळे भारतासह जगभरातील यूजर्सना  'व्हॉटस्‌ॲप' च्या नवीन व्हर्जनवरून सोमवार (दि.२२) पासून एकावेळी केवळ पाच लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येतील, असे 'व्हॉटस्‌ॲप'ने सोमवारी (दि.२२) जाहीर केले आहे.

वाचा : फेक न्यूज रोखण्यासाठी 'व्हॉटस्‌ॲप'चे सीईओ भारतात

याआधी यूजर्सना एकावेळी २० पेक्षा जास्त लोकांना मेसेज फॉरवर्ड करता येत होते. मात्र, आता त्यावर मर्यादा घातली आहे. गोपनियतता आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले असल्याचे 'व्हॉटस्‌ॲप'ने म्हटले आहे. "आम्ही नेहमीच यूजर्सना मिळालेले अनुभव जाणून घेऊ. त्यानंतर व्हायरल होणाऱ्या मजकूराबाबत नवीन मार्ग काढू" असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

वाचा : फेक न्यूज राष्ट्राला हानीकारक : राजवर्धनसिंह राठोड 

भारतात 'व्हॉटस्‌ॲप'वरील फेक न्यूज आणि अफवा पसरवणाऱ्या मेसेजमुळे जमावाकडून मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने याआधी 'व्हॉटस्‌ॲप'ला दोनवेळा नोटीस बजावली आहे. अफवा पसरवणारे मेसेज आणि फेक न्यूज रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना सरकारने 'व्हॉटस्‌ॲप'ला केली होती. त्याची दखल घेत 'व्हॉटस्‌ॲप'ने भारतातील यूजर्सना मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा घातली होती. 

वाचा : फेक न्यूजला शशी थरुर फसले

जगात 'व्हॉटस्‌ॲप'चे १०० कोटी यूजर्स आहेत. त्यात २० कोटी भारतातील यूजर्सचा समावेश आहे. 'व्हॉटस्‌ॲप'ची स्थापना २००९ मध्ये झाली होती. ही कंपनी फेसबुकने २०१४ मध्ये खरेदी केली. 'व्हॉटस्‌ॲप'ने २०१८ च्या सुरुवातीला म्हटले होते की, १.५ अब्ज यूजर्स दर दिवशी ६५ अब्ज मेसेज एकमेकाला पाठवितात.

वाचा : फेक न्यूज : सोशल मीडिया कंपनी प्रमुखांवर गुन्हा?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT