warren buffett pudhari
आंतरराष्ट्रीय

टॉप 10 अब्जाधीशांची संपत्ती घटत असताना केवळ 'हा' अब्जाधीश सेफ

Warren Buffett: या वर्षात आत्तापर्यंत संपत्तीत सुमारे 13 अब्ज डॉलरची मोठी घट

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील 180 देशांवर टॅरिफची घोषणा केली आणि ती जगभरातील वित्तीय बाजारांसाठी 'टेरिफिक' ठरली. कारण त्यानंतर जगभरातील शेअर मार्केट धडाधड कोसळले.

साहजिकच त्याचा परिणाम अब्जाधीशांच्या संपत्तीवरही झाला. जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीतील 9 जणांच्या संपत्तीत मार्केट क्रॅशमुळे मोठी घट झाली. केवळ एकच अब्जाधीश यापासून बचावला. त्याच्या संपत्तीत घट झालेली नाही, उलट या वर्षात म्हणजे 2025 मधील पहिल्या चार महिन्यात त्यांच्या संपत्तीत भरच पडलेली आहे.

गुंतवणुकीची स्मार्ट स्ट्रॅटेजी

हा स्मार्ट अब्जाधीश म्हणजे बर्कशायर हॅथवे कंपनीचे अध्यक्ष आणि CEO 93 वर्षांचे वॉरेन बफेट. स्मार्ट गुंतवणूकदार म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे. गुंतवणुकीची त्यांची स्वतःची अशी एक रणनीती असते, अभ्यास असतो. म्हणूनच ते इतरांपेक्षा स्मार्ट गुंतवणूकदार ठरतात. सुरवातीपासून स्वतःचे पैसे सुरक्षित ठेवण्यात वॉरेन बफेट यांचा हातखंडा आहे.

विशेष म्हणजे आताही जगभरातील मार्केट क्रॅशमधून ते केवळ बचावलेच आहेत असे नाही तर या वर्षातील पहिल्या चार महिन्यांत त्यांच्या संपत्तीत 12.7 अब्ज डॉलरची भरदेखील पडली आहे. कंझ्युमर गुड्स, उर्जा, विमा, बँकिंग या क्षेत्रात वॉरेन बफेट यांची मोठी गुंतवणूक आहे. सध्याच्या जागतिक स्थितीत आर्थिक घसरणीला या क्षेत्रांमधून अधिक प्रतिरोध आहे. ही क्षेत्रे कमी अस्थिर आहेत.

अमेरिकेतील स्टॉक मार्केट्समध्ये ट्रॅम्प टॅरिफ जाहीर झाल्यानंतरच्या दोन दिवसात वॉल स्ट्रीटवर अर्थात तेथील शेअर बाजारात गुंतवणूकदारांना तब्बल 5 ट्रिलियन डॉलरचा तोटा झाला आहे. पण वॉरेन बफे्ट त्यांच्या गुंतवणुकीत नफ्यात राहिलेले आहेत.

वॉरेन बफेट यांच्याकडे सुमारे 30 हजार कोटींची कॅश 

गेल्या काही काळात वॉरेन बफेट यांनी त्यांच्याकडील अनेक स्टॉक्सची मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यांनी त्यांच्याकडील ॲपलचे तीन चतुर्थांश शेअर्स विकले. तसेच त्यांच्याकडील एकूण 134 अब्ज डॉलर किमतीचे शेअर्स त्यांनी विकले.

विशेष म्हणजे त्यानंतरच्या काळात ॲपलचा स्टॉक 28 टक्क्यांनी घसरला. आजघडीला वॉरेन बफेट 334 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 30 हजार कोटींची रोकड बाळगून आहेत.

बफेट यांची रणनीती...

334 बिलियन डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश बाळगून असल्याने गेल्या काही काळात वॉरेन बफेट यांच्याविषयी चर्चा सुरू होती. कारण वॉरेन बफेट यांची ओळख स्मार्ट गुंतवणूकदार अशी आहे. जगभरातील धोक्याचा अंदाज त्यांना खूप आधी येतो, असे म्हणतात.

त्यामुळेच त्यांनी कॅश गोळा करणे याचा अर्थ एकतर ते एखाद्या नव्या मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहेत किंवा शेअरबाजारासाठी तो धोक्याचा इशारा आहे, असा घेतला जातो.

यापुर्वीही बफेट यांनी जेव्हा जेव्हा शेअर्स विकून मोठी कॅश गोळा केली तेव्हा तेव्हा ते शेअर मार्केटमधील मोठ्या पडझडीतही सेफ राहिले असल्याची उदाहरणे त्यांना फॉलो करणाऱ्या जगभरातील गुंतवणकूदारांकडून दिली जातात.

वॉरेन बफे्ट यांच्याकडे 155 अब्ज डॉलर संपत्ती

वॉरेन बफे्ट यांनी या वर्षात त्यांच्या संपत्तीत 12.7 अब्ज डॉलरची भर टाकली आहे. आजघडीला त्यांचीसंपत्ती निव्वळ संपत्ती 155 अब्ज डॉलवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, स्टॉक मार्केट्स अस्थिर असताना आणि जागतिक मंदीची शक्यता असतानाच्या काळातील ही प्रगती आहे.

जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट

जगातील अत्याधिक धनवंत एलन मस्क, जेफ बेजॉस, मार्क झुकेरबर्ग यांच्यासह जगभरातील टॉप 500 अब्जाधीशांनी ट्रम्प टॅरिफची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 208 बिलियन डॉलर गमावले होते. म्हणजे या सर्वांच्या संपत्तीतील एकित्रित घट तब्बल 208 बिलियन डॉलर इतकी होती.

एलन मस्क यांच्या संपत्ती या वर्षात 130 अब्ज डॉलरची घट झाली आहे. तर जेफ बेजॉस यांच्या संपत्तीत 45.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT