बेरूत : युद्धबंदीनंतर घरी परतणार्‍या लेबनॉनमधील नागरिकांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे शांती पथक दाखल झाले आहे. 
आंतरराष्ट्रीय

Global economy war impact | युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; मंदीची भीती

नाणेनिधी, जागतिक बँकेच्या बैठकीत चिंतेचे वातावरण; अमेरिकेच्या भूमिकेवर टीका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन डीसी; वृत्तसंस्था : 1970 नंतरचा सर्वात मोठा ऊर्जा धक्का बसला असून, त्यामुळे जागतिक मंदीचा धोका वाढत असल्याचा सूर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर गंभीर चर्चा झाली.

ऊर्जा दरवाढीमुळे जगभरात जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. याचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर होत आहे. अनेक देशांमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाली असून काही देश ‘घाबरलेल्या स्थितीत’ असल्याचे प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएव्हा यांनी सांगितले.

20 बैठकीत तणावपूर्ण वातावरण

20 देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत वातावरण गंभीर आणि तणावपूर्ण होते. अमेरिकेचे निर्णय आणि युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर खुलेपणाने चर्चा झाली. तज्ज्ञांच्या मते, काही देशांवर या संकटाचा अधिक मोठा फटका बसणार आहे.

अमेरिकेच्या भूमिकेवर टीका

ब्रिटनच्या अर्थमंत्री रॅचल रीव्हस यांनी इराण युद्धाला ‘चूक’ आणि ‘निरर्थक’ असे संबोधत अमेरिकेच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, या युद्धामुळे ऊर्जा दर वाढून ब्रिटनमधील कुटुंबे आणि उद्योग अडचणीत आले आहेत.

जागतिक सहकार्याला धक्का

युद्धापूर्वी जागतिक सहकार्य, रोजगार आणि गरिबी निर्मूलन यावर लक्ष केंद्रित होते; मात्र आता देशांना अमेरिकेच्या निर्णयांपासून स्वतःचे संरक्षण कसे करायचे, याचा विचार करावा लागत आहे, असे मत काही युरोपीय देशांनी व्यक्त केले. तज्ज्ञांच्या मते, नवीन जागतिक आर्थिक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT