नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन
अमेरिकेच्या वॉलमार्ट या कंपनीने भारतील आघाडीच्या इ-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिफकार्टला विकत घेतले आहे. फ्लिफकार्टमध्ये आता ७७ टक्के वाटा आता वॉलमार्टचा असणार आहे. वॉलमार्टने फ्लिफकार्टला १.१२ लाख कोटी रुपयांना विकत घेतले. इ-कॉमर्स कंपनीच्या बाबतीत जगातील हा सर्वात मोठा व्यवहार असल्याचे मानले जात आहे. या व्यवहारानंतर वॉलमार्ट ही भारतातील सर्वात मोठी मल्टीनॅशलन इ-कॉमर्स कंपनी बनली आहे.
कमी वेळात फ्लिपकार्टने बाजारात आपले वेगळे नाव कमावले होते. इंटरनेटवरून चालणाऱ्या स्टार्टअप उद्योगाचा हा एक अतिशय चांगला नमुना होता. सुरूवातीपासून शेवटपर्यंत कोणात्याही बाह्य सहकार्याशिवाय फ्लिपकार्टची घौडदौड सुरू होती. सचिन बंन्सल आणि बिन्नी या दिल्ली आयआयटीमध्ये शिक्षण घेतलेल्या दोघांनी स्टार्टअप तत्वावर फ्लिपकार्टची स्थापना केली होती. नव्या पिढीत इंटरनेटवरचा एक ब्रँड म्हणून त्यांनी फ्लिपकार्टला मोठे यश मिळवून दिले. सचिन बन्सल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन या व्यवहारासाठी बुधवारी भारतात आले होते. त्यांनी याबाबतची घोषणा केली.
Tags : Walmart, buy, 77% stake, Flipkart, 16 billion dollar