Bullfight  
आंतरराष्ट्रीय

Viral Video | स्पेनमधील बुलफाईटचा थरार, खेळाडूंची कौशल्य पाहताना काळजाचा ठोका चुकतो!

स्पेनमधील 2025 मधील विविध बुलफाईट्स मधील खेळाडूंच्या लक्षवेधी लढतींचे कलेक्शन

Namdev Gharal

Bullfight स्पेनमधील बुल फाईटही जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. उन्मत सांड व लाल फडके घेऊन त्‍याचा कंट्रोल करणारा खेळाडू ही लढत पाहताना अंगावर काटा येतो. फूरफरणारे प्रंचड आकाराचे व टोकदार शिंगे असलेले धूड अंगावर येत असतो त्‍याचवेळी त्‍याला कौशल्याने चकवा देण्याचे काम खेळाडू करत असतो. हे पाहताना काहीवेळा मात्र आपल्या पोटात भितीचा गोळा येतो.

हा खेळ स्पेनच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे तसेच जगातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळाला स्पॅनिशमध्ये Corrida de toros असे म्हटले जाते . या खेळाचे जगभर चाहते आहेत. हा एक खेळ नसून, ती स्पेनमधील एक प्राचीन कला आणि शौर्याचे प्रतीक मानली जाते.

काय आहे हा खेळ?

बुल फाईटमध्ये मुख्य खेळाडूला 'माटाडोर' (Matador) म्हटले जाते. माटाडोर आपल्या हातातील लाल रंगाचे कापड (ज्याला 'मुलेटा' म्हणतात) फडकवून बैलाला स्वतःकडे आकर्षित करतो. अत्यंत चपळाईने बैलाच्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करत, शेवटी बैलावर विजय मिळवणे, असे या खेळाचे स्वरूप असते.

या खेळामध्ये जुआन बेलमोंटे (Juan Belmonte): त्यांना 'आधुनिक बुल फायटिंगचा जनक' मानले जाते. त्यांनी खेळाची शैली बदलली आणि बैलाच्या अत्यंत जवळ जाऊन लढण्याची पद्धत सुरू केली. त्‍यानंतर मानोलोते (Manolo Rodríguez Sánchez तसेच एल कोर्डोबेस (El Cordobés हे काही प्रसिद्ध खेळाडू आहेत.

या व्हायरल व्हिडीओ मध्ये माटाडोरची कौशल्य पाहताना मात्र काळजाचा ठोका चुकतो. आता धडक बसणार असे वाटत असतानाच माटाडोर इतक्या सहजतेने बाजूला होतो ते पाहून विश्वास बसत नाही. adventuretaurina या पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT