Siba Inu dog 
आंतरराष्ट्रीय

Viral Video | ट्रक ड्रायव्हरला प्रत्‍येक कामात अचूकपणे मदत करणार कुत्रा पाहून अचंबित व्हाल!

जपानमधील Shiba Inu जातीचा कुत्रा, अनेक कामात करतो मालकाला मदत

Namdev Gharal

Shiba Inu dog माणसाचा खरा सोबती म्हणजे कुत्रा हे अगदी अश्मयुगीन काळापासून असलेले सिद्ध होत आले आहे अशा अनेक घटना जगामध्ये पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी आपल्या लाडक्या कुत्र्याला घरातील सदस्यच मानले जाते. इमानदारीतही या प्राण्याची तुलना इतर कोणत्‍याच प्राण्याशी होऊ शकत नाही. कुत्र्यांच्या भन्नाट कारनाम्यांचे किस्से किंवा व्हिडीओ प्रसिद्ध होत असतात. आता एका सध्या सोशल मिडीयावर अशाच एका कुत्र्याचा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. यामध्ये एक कुत्रा आपल्या ट्रक ड्रायव्हर असलेल्या मालकाला ताडपत्री गुडांळण्यास मदत करत असल्याचे दिसत आहे.

अचूकपणे ताडपत्री गुडांळण्याचे कौशल्ये

हा व्हिडिओ प्रामुख्याने जपानमधील असल्याचे सांगितले जात आहे, यामध्ये आपल्याला दिसते की (Shiba Inu) जातीचा कुत्रा एका मोठ्या गोडावून मध्ये एक मोठी ताडपत्री गुंडाळण्यासाठी मालकाच्या सूचनेनुसार काम करत आहे. घडी घालण्यासाठी ताडपत्रीच्या एका कोपऱ्यावर बसणे. लगेच दुसऱ्या बाजूला जावून ताडपत्रीचा एक कोपरा दातात धरुन दुसऱ्या बाजूला आणून ठेवणे. पूर्ण घडी घालून झाल्यावर त्‍या ताडपत्रीचा कव्हर आणून मालकाला हा कुत्रा आणून देतो

व्हिडीओत दिसते की हा कुत्रा अचूकपणे काम करत आहे. सराव असल्यामुळे तो हे सहजपणे करत असल्याचे दिसते. हा कुत्रा ताडपत्रीचा एक कोपरा आपल्या तोंडात धरून तो योग्य दिशेला ओढतो. या व्हिडिओमध्ये ताडपत्री ओढताना त्या कुत्र्याचे 'टायमिंग' आणि मालकाच्या सूचना समजून घेण्याची पद्धत पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत.

Shiba Inu बुद्धीमान कुत्र्याची जात

जपानमधील शिबा इनू Shiba Inu हे कुत्रे मुळातच खूप चपळ आणि बुद्धिमान असतात. ही सर्वात जुनी आणि लोकप्रिय लहान शिकारी कुत्र्याची जात आहे. त्यांच्या हुशारीसाठी आणि मालकाप्रती असलेल्या निष्ठेसाठीही हे कुत्रे ओळखले जाते त्‍याला जर योग्य प्रशिक्षण दिले तर ते सहज कोणतीही गोष्ट शिकते. यांचा स्वभाव खूप स्वतंत्र, धैर्यवान आणि सतर्क असतो, ज्यामुळे ते उत्तम 'वॉचडॉग' ठरू शकतात. तसेच हे कुत्रे दिसायला एखाद्या कोल्ह्यासारखे दिसतात.

अशाच प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर

'शिबा इनू' ही जपानचीच मूळ कुत्र्याची जात आहे. मात्र, काही तत्सम व्हिडिओ थायलंड किंवा व्हिएतनाममधील ट्रक ड्रायव्हर्सचेही व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओत हा कुत्रा ट्रकच्या केबिनमध्ये आपल्या मालकासोबत (ड्रायव्हर) बसलेला दिसतो. तो केवळ सोबती म्हणून नाही, तर ड्रायव्हरला डुलकी लागल्यास किंवा त्याचे लक्ष विचलित झाल्यास त्याला सावध करताना दिसतो. काही व्हिडिओत तो रिव्हर्स घेताना किंवा ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हरला 'अलर्ट' करण्याचे काम करतानाही दाखवला आहे. हे व्हिडीओ पाहून 'Best Assistant' किंवा 'Hardworking Dog' अशा कमेंट्स मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT