व्हेनेझुएला राष्‍ट्राध्‍यक्षपदी पुन्‍हा एका निकोलस मादुरो यांनी बाजी मारली आहे.  X (Twitter)
आंतरराष्ट्रीय

व्हेनेझुएलात सत्तांतर नाहीच!, राष्‍ट्राध्‍यक्षपदी पुन्‍हा निकोलस मादुरो

सलग तिसर्‍यांदा निवडणुकीत मारली बाजी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : व्हेनेझुएला राष्‍ट्राध्‍यक्षपदी ( Venezuelan President ) पुन्‍हा एका निकोलस मादुरो (Nicolas Maduro) यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष निकोलस मादुरो यांना 51 टक्के तर विरोधी पक्षांचे उमेदवार एडमंडो गोन्झालेझ यांना 44 टक्के मिळाली आहेत, अशी घोषणा देशातील निवडणूक आयोगाने आज (दि.२९) केली. आतापर्यंत ८० टक्‍के मतमोजणी झाली असून यामध्‍ये मादुरो यांनी ५१ टक्‍के मते मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. दरम्‍यान, यंदाच्‍या निवडणुकीत सर्व विराेधी पक्ष मादुराे यांच्‍याविराेधात एकवटले हाेते. त्‍यामुळे व्हेनेझुएलामध्‍ये सत्तांतर हाेणार, अशी चर्चा हाेती.मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

मादुरो यांच्‍याविरोधात एकवटले देशातील विरोधी पक्ष

रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश . व्हेनेझुएला हे एक प्रजासत्ताक संघराज्य आहे. १९६१ पासून देशातील संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांची निवड पाच वर्षांसाठी प्रत्यक्ष सार्वत्रिक मतदान पद्धतीने होते. व्हेनेझुएलामध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सलग ११ वर्ष सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र यंदा विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे अध्यक्ष मादुरो यांना प्रथमच सर्वात आव्‍हानात्‍मक निवडणूक होती. ६१ वर्षीय मादुरो यांना ७४ वर्षीय एडमंडो गोन्झालेझ यांनी आव्‍हान दिले होते. व्हेनेझुएलाला गेल्या दशकापासून आर्थिक संकटाशी झुंज देत आहे. या समस्‍येमुळचे देशातील तब्‍बल ७० लाखांहून अधिक नागरिकांनी स्‍थलांतर केले असल्‍याचा आरोप विरोधी पक्ष करत होते. विशेष म्‍हणजे यंदा त्‍यांच्‍या विरोधात ४४ टक्‍के मतदान झाले आहे.

निकोलस मादुरोंनी दिली आर्थिक विकासाची हमी

मतदान प्रक्रिया पार पडल्‍यानंतर मादुरो म्‍हणाले होते की, 'आम्ही शांतता आणि आर्थिक विकासाची हमी देत ​​आहोत. व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचे तेल उत्पन्नावरील अवलंबित्व कमी होईल. व्हेनेझुएलाचे डावे नेते आणि तत्‍कालीन ह्यूगो चावेझ यांचे २०१३ मध्ये निधन झाले. यानंतर मादुरो यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. आता सलग तिसर्‍यांदा सत्ता काबीज करत त्‍यांनी सत्ता अबाधित ठेवण्‍यात यश मिळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT