Iran US War pudhari photo
आंतरराष्ट्रीय

Iran US War: 'USS अब्राहम लिंकन' ची इराणकडे कूच... एक स्ट्रायकर ग्रुप अख्ख्या लष्करासमान; विद्ध्वंस अटळ?

अमेरिकेच्या नौसेनेचा अब्राहम लिंकन हा एक पूर्ण स्ट्रायकर ग्रुप आहे. यात एअरक्राफ्ट कॅरिअरची भूमिका महत्वाची आहे.

Anirudha Sankpal

Iran US War USS Abraham Lincoln Carrier Deployed: अमेरिकेच्या नौसेनेची निमित्ज क्लास सुपर कॅरिएर 'USS अब्राहम लिंकन दक्षिण चीन समुद्रातून मध्य पूर्वेकडं रवाना झाली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढल्यानंतर या कॅरिअरची दिशा बदलण्यात आली आहे. ही फ्लीट खूप शक्तीशाली असून संपूर्ण लष्कराला ही भारी पडू शकते.

अब्राहम लिंकन कॅरिअर स्ट्रायकर ग्रुप

अमेरिकेच्या नौसेनेचा अब्राहम लिंकन हा एक पूर्ण स्ट्रायकर ग्रुप आहे. यात एअरक्राफ्ट कॅरिअरची भूमिका महत्वाची आहे. त्यातचबरोबर यात या डिस्ट्रॉयर स्क्वाड्रनमध्ये २१ जहाजे सामील आहेत.

ग्रुपमध्ये एकूण किती जहाजे?

अमेरिकेच्या या डिस्ट्रॉयर फ्लीटमध्ये १ एअरक्राफ्ट कॅरियर युएसएस अब्राहम लिंकन सामील आहे. हे कॅरिअर न्युक्लिअर पॉवर्ड असून त्याचे वजन 100000 टनापेक्षा जास्त आहे. हे जगातील सर्वात मोठ्या लष्करी जहाजापैकी एक जहाज आहे.

या फ्लीटमध्ये ३ ते ४ गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयरचा देखील समावेश आहे. यात युएसएस मायकल मर्फी, युएसएस सुप्रुआन्स, युएसएस फ्रँक ई पिटर्सन ज्यूनियर हे एअर डिफेन्स सिस्टम, अँटी सबमरीन आणि लँड अटॅकसाठी वापरले जातात. तसेच १ क्रूझर देखील असते.

या फ्लीटमध्ये १ ते २ न्युक्लिअर अटॅक सबमरीन देखील असतात. या सबमरीन शत्रूची जहाजे आणि पाणबुड्या शोधून ती डिस्ट्रॉय करतात. तसेच या फ्लीटमध्ये १ ते २ सपोर्ट जहाजे देखील असतात. या फ्लीटमध्ये एकूण मिळून १ एअरक्राफ्ट कॅरिअर, ३ ते ६ सरफेट कॉम्बेट्स, १ ते २ सबमरीन अन् १ सपोर्ट शिप अशी जहाजे असतात.

किती सैनिक अन् लढाऊ विमाने?

या फ्लीटमध्ये फक्त कॅरिअरवर ५००० ते ६००० लोकं क्रू आणि एअर विंगच्या विभागाची असतात. तर संपूर्ण ग्रुपमध्ये ७००० ते ८००० सैनिक आणि मरीन कमांडो असतात. या फ्लीटमध्ये ६५ ते ७० लढाऊ विमाने असतात.

यात F/A-18E/F Super Hornet (मल्टी-रोल फाइटर), F-35C Lightning II (स्टील्थ फाइटर, VMFA-314 स्क्वाड्रन), E-2D Hawkeye (एडब्ल्यूएसीएस, सर्विलांस), MH-60R/S Seahawk (हेलीकॉप्टर, एंटी-सबमरीन आणि सर्च-एंड-रस्क्यू), EA-18G Growler (इलेक्ट्रॉनिक वारफेयर) या विमान अन् हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांची ताकद

टोमाहॉक क्रूझ मिसाइल: या स्ट्रायकर ग्रुपमधील विनाशिका (Destroyers) आणि पाणबुड्यांवर शेकडो टोमाहॉक क्षेपणास्त्रे तैनात आहेत. एका विनाशिकेवर ९० पेक्षा जास्त 'VLS सेल्स' असतात. संपूर्ण ग्रुप मिळून ५०० ते १०००+ टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागू शकतो.

हवाई हल्ल्याची शस्त्रे: विमानातून डागता येणारी AIM-120 AMRAAM, AGM-88 HARM, JDAM आणि JSOW सारखी हजारो किलो वजनाची प्रगत क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब हा ग्रुप वाहून नेतो.

संरक्षण प्रणाली: शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यासाठी Sea Sparrow, ESSM, RAM आणि SM-6 सारखी बॅलिस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टम यात आहे.

अणुशक्ती: हे विमानवाहू जहाज स्वतः अणुशक्तीवर (Nuclear-powered) चालते, मात्र त्यावर सध्या अण्वस्त्रे तैनात नाहीत.

इराणला होणारे संभाव्य नुकसान

हवाई हल्ले: अब्राहम लिंकन कॅरिअर यावरील ७०+ विमाने दररोज १०० ते १५० पेक्षा जास्त वेळा उड्डाण (Sorties) करून इराणचे एअरबेस, मिसाइल साइट्स आणि ऑईल फॅसिलिटीवर अचूक हल्ले करू शकतात.

क्रूझ मिसाइल मारा: टोमाहॉक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने इराणच्या जमिनीवरील लष्करी तळ, नौदल आणि अणू केंद्रांना दूरवरूनच लक्ष केले जाऊ शकते.

नौदल आणि अर्थव्यवस्थेवर आघात: इराणच्या नौदलाचा (लहान जहाजे) हा ग्रुप पूर्णपणे नाश करू शकतो. होर्मुजची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ताब्यात घेऊन इराणच्या तेल निर्यातीला खिळ बसवू शकतो, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT