Modi-Fridman Podcast  X Image
आंतरराष्ट्रीय

Modi-Fridman Podcast मध्ये AI व्हॉईस क्लोनिंग टेक्नॉलॉजीचा वापर

भाषेच्या बंधनांवर मात करण्यास झाली मदत

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: सुप्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर आणि AI संशोधक लेक्स फ्रिडमन यांनी नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पॉडकास्ट मुलाखत घेतली. यात मोदींनी आरएसएस मधील त्यांचे दिवस ते पाकिस्तानची सद्यस्थिती याबाबत मुक्तपणे संवाद साधला. ही पॉडकास्ट मुलाखत गाजली देखील. तथापि, या पॉडकास्टमागे फ्रिडमन यांनी AI ची देखील मदत घेतली होती.

AI चे पाठबळ असलेले हिंदी आणि इंग्रजी भाषा डबिंग करणारे एक व्हॉईस क्लोनिंग स्टार्टअप इलेव्हनलॅब्जची मदत फ्रिडमन यांनी या पॉडकास्टसाठी घेतली होती. त्यामुळे फ्रिडमन यांना पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना कसलीही अडचण आली ऩाही. बिझनेस स्टँडर्डने याबाबतचे वृत्त दिले आहे.

(AI-powered voice cloning technology used in Modi-Fridman Podcast)

रविवारी प्रसारित झालेल्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, Artificial intelligence (AI) मानवी कल्पनाशक्तीच्या आधारे अनेक गोष्टी निर्माण करू शकते. त्याची झलकच या पॉडकास्टद्वारे पाहायला मिळाली आहे.

अमेरिकेतील इलेव्हनलॅब्ज या स्टार्टअपने या पॉडकास्टचे तत्काळ डबिंग केले होते. ही एक सॉफ्टवेयर कंपनी आहे. जी AI voice cloning technology चा वापर करते. या तंत्रज्ञानाच्या सहायानेच पंतप्रधान मोदी आणि फ्रिडमन यांचा आवाजाची ऑथेंटिसिटी भाषांतरातही जपली गेली. अगदी बोलण्याची लकब, स्टाईल, भावना, स्वरांचे उच्चारण याचीही काळजी या तंत्रज्ञानाद्वारे घेतली गेली.

काय आहे AI voice cloning?

इलेव्हनलॅब्ज या स्टार्टअपने दिलेल्या माहितीनुसार, एआय व्हॉईस क्लोनिंग या तंत्रज्ञानात बोलले गेलेले शब्द विविध भाषेत भाषांतरित केले जातात. यात ओरिजिनल स्पीकर जो आहे म्हणजे बोलणारा व्यक्ती त्याच्या आवाजाचाही हुबेहुब कॉपी केली जाते. जेणेकरून विविध भाषांमध्ये डब केला गेलेला कंटेट किंवा बोलणे ऑथेंटिक वाटू शकेल.

तीन तासांच्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदी त्यांचे बालपण ते आत्तापर्यंतचा प्रवास, पंतप्रधान बनल्यानंतरच्या घडामोडी, नेतृत्वगुण, लोकशाही, मुत्सद्देगिरी, गरीबी, डोनाल्ड ट्रम्प, चीन, गुजरात दंगल, पाकिस्तान याबाबत व्यक्त झाले होते.

सद्यस्थितीत या पॉडकास्टमध्ये ऑडियो आणि सबटायटल्स हे हिंदी, इंग्रजी आणि रशियन भाषेत उपलब्ध आहेत. याशिवाय मूळ इंग्रजी आणि हिंदी मिक्स असलेल्या भाषेतही ते उपलब्ध आहेत. काही काळानंतर ते इतरही भाषेंमध्ये उपलब्ध होतील.

दरम्यान, इलेव्हनलॅब्जच्या सहसंस्थापक मॅटी स्टॅनीस्झेवस्की यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, तज्ज्ञांनी अगदी नैसर्गिक वाटेल असे एक स्पीच सिंथेसिस सॉफ्टवेयर डीप लर्निंगच्या सहाय्याने विकसित केले आहे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा पॉडकास्ट उपल्ध केल्याबद्दलमला आमच्या टीमचा खूप अभिमान वाटतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT