File Photo
आंतरराष्ट्रीय

Gold | अमेरिकेकडे सर्वात मोठा सुवर्णसाठा, भारत जगात कितव्या स्थानी?

जगभरात 2 लाख 44 हजार मेट्रिक टन सोने उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

सोन्याच्या साठ्यावरून एकाद्या देशाची आर्थिक ताकद दिसून येते. जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण झाल्यावर सोन्याकडे महत्त्वाचे साधन म्हणून पाहिले जाते. सोने केवळ अमूल्य धातू नसून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाचा स्तंभ आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जगातील 20 प्रमुख देशांतील सोन्याच्या साठ्यांची थोडक्यात माहिती.

18 व्या शतकापासून

18 व्या शतकापासून सोेने हे जागतिक अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनले आहे. अनेक देशांनी त्यांचे चलन सोन्याच्या साठ्याशी निगडित ठेवले होते. 20 शतकामध्ये तर अनेक देशांनी त्यांचे चलन सोन्याच्या मूल्याशी निगडित ठेवले होते. या प्रकारास ‘गोल्ड स्टँडर्ड’ म्हणतात. सोन्याच्या साठ्यावर संबंधित देशाच्या आर्थिक ताकदीची प्रचिती येते.

1970 पासून

1970 पासून जागतिक बाजारात सोन्याच्या साध्या वापराचा उपयोग बंद झाला. याचा अर्थ सोन्याचे महत्त्व कमी झाले असा नाही. आजही सोन्याकडे सुरक्षित आणि स्थिर भांडवल म्हणून बघितले जाते. एकाद्या देशात आर्थिक अरिष्ट आल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारात सोन्याचा साठा उपयोगी पडतो. कर्जप्राप्तीसाठी सोन्याच्या साठ्याचा उपयोग होतो.

2,44,000 मेट्रिक टन

जगभरात 2 लाख 44 हजार मेट्रिक टन सोने उपलब्ध आहे. यापैकी 1 लाख 87 हजार मेट्रिक टन सोन्याचे उत्पादन झाले असून 57 हजार मेट्रिक टन सोन्याचे अद्याप उत्खनन व्हायचे आहे. चीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील खाणींमध्ये सर्वाधिक सोने आढळून आले आहे. 2016 मध्ये सोने उत्पादनात अमेरिका चौथ्या स्थानी होता.

सोन्याचा साठा कशासाठी

आर्थिक स्थिरता : आर्थिक संकटावेळी सोन्याचा साठा कामी येतो.

चलन साठ्यास मदत होते.

सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित व विश्वसनीय समजली जाते.

सोन्याचा सर्वाधिक साठा असणारे 20 प्रमुख देश

अमेरिका : 8,133.46 टन

जर्मनी : 3,351.53 टन

इटली : 2,451.84 टन

फ्रान्स : 2,436.97 टन

रशिया : 2,335.85 टन

चीन : 2,264.32 टन

जपान : 845.97 टन

भारत : 840.76 टन

नेदरलँड : 612.45 टन

तुर्की : 584.93 टन

पोर्तुगाल : 382.66 टन

पोलंड : 377.37 टन

उझबेकिस्तान : 365.15 टन

ब्रिटन : 310.29 टन

कझाकिस्तान : 298.8 टन

स्पेन : 281.58 टन

ऑस्ट्रिया : 279.99 टन

थायलंड : 234.52 टन

सिंगापूर : 228.86 टन

बेल्जियम : 227.4 टन

स्त्रोत : वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT