एका उपग्रह प्रतिमेमध्ये इराणमधील खर्ग बेटावरील तेल निर्यात केंद्र.  फोटो रॉयटर्स
आंतरराष्ट्रीय

US strike Iran: इराणचे प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या 'खार्ग' बेटावर अमेरिकेचा भीषण हवाई हल्ला

US strike on Iran Kharg Island: अमेरिकन हवाई दलाने इराणचे 'मुकुटमणी' मानल्या जाणाऱ्या 'खार्ग बेटा'वर आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बवर्षाव केला.

मोहन कारंडे

US strike on Iran Kharg Island

वॉशिंग्टन: मध्यपूर्वेतील युद्ध आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. अमेरिकन हवाई दलाने इराणचे 'मुकुटमणी' मानल्या जाणाऱ्या 'खार्ग बेटा'वर आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात इराणचे सर्व महत्त्वाचे लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

तेल साठ्यांना धक्का नाही, पण...

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, "माझ्या आदेशानुसार, अमेरिकन सेंट्रल कमांडने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली हवाई हल्ला केला आहे. आम्ही खार्ग बेटावरील इराणची लष्करी ताकद पूर्णपणे नेस्तनाबूत केली आहे. मात्र, आम्ही तेथील तेलाच्या पायाभूत सुविधांना धक्का लावलेला नाही."

होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यास गंभीर परिणाम

इराणने 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून होणारी आंतरराष्ट्रीय जहाजांची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्यास तेल साठ्यांवर हल्ला केला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणकडे अमेरिकेच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही क्षमता नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. इराणचे संपूर्ण मध्यपूर्वेवर ताबा मिळवण्याचे आणि इस्रायलला संपवण्याचे स्वप्न आता कायमचे धुळीस मिळाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

तेहरानमध्ये मोठा स्फोट

एकीकडे खार्ग बेटावर हल्ला झाला असतानाच, इराणची राजधानी तेहरान येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित रॅलीत एक मोठा स्फोट झाला. या रॅलीत हजारो लोक आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. इस्रायलने यापूर्वीच अशा रॅलींना लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. या स्फोटातील जीवितहानीबद्दल अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT