प्रातिनिधिक छायाचित्र.  image source X
आंतरराष्ट्रीय

भारताला अमेरिकेकडून परत मिळाला प्राचीन कलाकुसरीचा मौल्यवान ठेवा!

US Returns Looted Antiquities | १४०० कलाकृतींची किंमत १० मिलियन डॉलर्स

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतातील स्‍थापत्‍यशैली, मूर्तीकलेला जगात तोड नव्हती. भारताने विविध परकीय आक्रमनांचा सामना केला. यावेळी झालेल्‍या लुटीत देशातील अनेक पुरातन मूर्ती, जवाहर, हिरे मोती यांची लूट झाली होती. याचे स्‍मरण करण्‍याचे कारण की, भारतातील लूटून नेलेल्‍या आणि सध्‍या अमेरिकेत असणार्‍या मूर्ती व प्राचीन कलाकृती भारताला परत करण्‍यात आल्‍या आहेत. या मौल्‍यवान वस्‍तूंची किंमत आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत सुमारे १० मिलीयन डॉलर (सुमारे ८४ कोटी) इतकी आहे. यासंदर्भातील वृत्त 'सीएनएन' ने दिले आहे.

सुमारे १४०० कलाकृती

भारतातून लुटून नेलेल्‍या सुमारे १४०० कलाकृती आहेत. त्‍या सध्‍या अमेरिकेत होत्‍या. त्‍या भारताला परत करण्‍यात आल्‍याचे मॅनहॅटन जिल्‍हा ॲटोर्नी ऑफिसने यासंदर्भात बुधवार (१३ नोव्हे.) रोजी घोषणा केली आहे. या कलाकृती आजही सुस्‍थितीत आहेत. न्यु यॉर्क मधील मेट्रोपोलिटीन मुझियम ऑफ आर्टमध्ये त्‍या ठेवलेल्‍या आहेत. यामध्ये एक नर्तकी वालूकामय दगडातील आहे. जी काही वर्षांपूर्वी लंडन येथे तस्‍करीच्या माध्यमातून आली होती. पण एका व्यक्‍तिने ती संग्रहालयाला भेट दिली.

पुरातन वस्‍तूंचाविक्रेत्‍याकडून वस्‍तू हस्‍तगत

संग्रहालयाने दिलेल्‍या माहितीनूसार एका लूटीच्या प्रकरणात तपास करताना नॅन्सी विनर आणि सुभाष कपूर या दोघांना अटक केली होती. कपूर हा पुरातन वस्‍तू विक्रेता होता. त्‍यांच्याकडून पोलिसांनी अनेक पुरातन वस्‍तू हस्‍तगत केल्‍या गेल्‍या ज्‍यांची किंमत लाखो डॉलर्स आहे. यापैकी अनेक कलाकृती या भारतातून चोरीला गेलेल्‍या होत्‍या. या प्रकरणी त्‍याला१० वर्षाची शिक्षा झाली आहे. सध्या सुभाष कपूर सध्या भारताच्या तामिळनाडूमधील तुरुंगात आहे. त्‍याचे अमेरिकेकडे प्रत्‍याप्रर्ण होणार आहे.

मॅनहॅटनच्या पुरातन वस्‍तू तस्‍करी विभागाने आतापर्यंत ४६० दशलक्ष डॉलर्सच्या ५८०० वस्‍तू आतापर्यंत जप्त केल्‍या आहेत. जुलै २०२४ मध्ये अमेरिका आणि भारताने बेकायदेशीर व्यापार रोखण्यासाठी व चोरी झालेल्या पुरातन वास्तू भारतात परत करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. या संदर्भातील दोन्ही देशात करार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT