पुढारी ऑनलाईन :
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी एका रॅलीत सांगितले की, जो बायडेन यांच्यापेक्षा कमला हॅरिस यांना पराभूत करणे अधिक सोपे आहे. दरम्यान यावेळी ट्रंम्प यांनी हॅरिस यांची खिल्ली उडवली. (US Presidential Election)
अमेरिकेमध्ये नोहेंबर महिन्यात अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या दोन तगड्या उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर होणार आहे. सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीतून माघारीनंतर डेमोक्रॅटीक पक्षाने उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. त्यातच या दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे.(US Presidential Election )
यादरम्यान माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांना उद्देशून एक प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की, जो बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांना हरवणे अधिक सोपे आहे. ट्रंम्प यांनी एका रॅलित हॅरिस यांची चेष्ट करताना म्हटले की, मी त्यांच्यापेक्षा चांगला दिसतो. ट्रंम्प यांनी पेंन्सिल्वानिया मध्ये एका रॅलित हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान हॅरिस या सोमवारी शिकागो मध्ये डेमोक्रॅटीक नॅशनल कन्वेशनच्या सुरूवातीच्या आधी आज (रविवार) पिट्सबर्गहून पेन्सिल्वानियापर्यंत दौरा करणार आहेत.(US Presidential Election )
डोनाल्ड ट्रम्प पेनसिल्व्हेनियातील एका रॅलीत म्हणाले, “मला वाटते की बायडेन यांच्या तुलनेत कमला हॅरिस यांना पराभूत करणे सोपे आहे. या शिवाय त्यांनी हॅरिस यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. या टिपण्यांमुळे ट्रम्प यांचेही निवडणुकीत नुकसान होऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(US Presidential Election )