अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू.  File Photo
आंतरराष्ट्रीय

Israel-Gaza war : 'इराणनंतर आता गाझामध्येही युद्धविराम ! इस्रायल शस्त्रसंधीसाठी तयार'

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांचा दावा, ६० दिवसांसाठी हाेणार युद्धविराम

पुढारी वृत्तसेवा

Israel-Gaza war

इस्रायल-गाझामध्ये ६० दिवसांच्या युद्धविरामासाठी (शस्त्रसंधी) आवश्यक अटींवर सहमत झाले आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला आहे. ट्रम्‍प यांच्‍या माहितीमुळे आता गाझामधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्षाला पूर्णविराम मिळण्‍याच्‍या दृष्‍टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.दरम्‍यान, यापूर्वी, इराण आणि इस्रायल यांच्यात १२ दिवस चाललेले युद्ध थांबवण्यातही आपण महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला होता.

शस्त्रसंधीसाठी आवश्यक अटींवर इस्रायल सहमत

डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'माझ्या प्रतिनिधींनी इस्रायलच्‍या अधिकाऱ्यांसोबत गाझा मुद्द्यावर दीर्घ आणि अर्थपूर्ण चर्चा केली. इस्रायल ६० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी आवश्यक अटींवर सहमत झाले आहे. या काळात आम्ही सर्व पक्षांसोबत मिळून युद्ध संपवण्याच्या दिशेने काम करू. हा प्रस्ताव अंतिम रूप देण्यात कतार आणि इजिप्तची महत्त्वाची भूमिका आहे.

हमास करार स्वीकारला नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते

'मला आशा आहे की, मध्य-पूर्वेच्या भल्यासाठी हमास हा करार स्वीकारेल, कारण परिस्थिती यापेक्षा चांगली होणार नाही. जर हमासने हा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर परिस्थिती आणखी बिघडू शकते.' पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पुढील आठवड्यातील अमेरिका दौऱ्यादरम्यान इस्रायल आणि हमास यांच्यात अधिकृत करार होईल, असा विश्‍वासही ट्रम्प यांनी व्यक्त केली.

हमास ओलिसांना सोडण्यास तयार; पण शस्त्रे खाली ठेवण्यास नकार

हमासने गाझामधील उर्वरित ओलिसांना सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत; परंतु शस्त्रसंधीस स्पष्ट नकार दिला आहे. हमासच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणानंतरच युद्धविरामाचा मार्ग निघेल, असे इस्‍त्रायलने स्‍पष्‍ट केले आहे.

हमासला इस्‍त्रायलने दिलेल्‍या प्रत्युत्तरात ५६ हजारांहून अधिक बळी

गाझामधील युद्धाची सुरुवात ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झाली, जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला करून १,२०० लोकांची हत्या केली आणि २५१ जणांना ओलीस ठेवले होते. प्रत्युत्तरात, इस्रायलच्या कारवाईत आतापर्यंत ५६,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत आणि या प्रदेशात गंभीर मानवतावादी संकट निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT