अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प. दुसर्‍या छायाचित्रात रशियाचे अध्‍यक्ष ब्लादिमीर पुतीन.  File Photo
आंतरराष्ट्रीय

"आपण पुतिन यांची काळजी करण्यात कमी वेळ घालवला पाहिजे..."

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्‍प यांनी पुन्‍हा साधला युराेपवर निशाणा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादानंतर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या युरोपीय नेत्यांकडून टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. डोनाल्‍ड ट्रम्प हे रशियाच्या जवळीक साधत आहेत, असा आरोप युरोप राष्‍ट्रांचे नेते करत आहे. तसच त्‍यांनी झेलेन्स्की यांना समर्थन दिले आहे. आता ट्रम्‍प यांनी सोशल मीडिया प्‍लॅटफॉर्मवर पोस्‍ट करत पुन्‍हा एकदा युरोपवर निशाणा साधला आहे.

जेणेकरुन आपण युरोपसारखे होऊ नये...

डाेनाल्‍ड ट्रम्‍प यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्रुथवर पोस्‍ट केली आहे की, "आपण पुतिनबद्दल काळजी करण्यात कमी वेळ घालवला पाहिजे आणि आपल्या देशात येणाऱ्या स्थलांतरित बलात्कार टोळ्या, ड्रग माफिया, खुनी आणि मानसिक संस्थांमधील लोकांबद्दल काळजी करण्यात जास्त वेळ घालवला पाहिजे - जेणेकरून आपण युरोपसारखे होऊ नये!"

झेलेन्‍स्‍कींना युरोपमधील राष्‍ट्रांचे समर्थन

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादानंतर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या युरोपीय नेत्यांकडून टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. युद्धाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनात मोठा बदल आणि रशियाशी जवळचे संबंध असल्याचे संकेत मिळत असल्‍याची टीकाही ते करत आहेत. अमेरिका युक्रेनला दिलेला पाठिंबा मागे घेईल, अशीही चर्चा सुरु झाले आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत झेलेन्स्की आणि ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात जोरदार वादविवाद झाला. नेत्यांमधील वादानंतर वॉशिंग्टन आणि कीव यांच्यातील आर्थिक करारावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ म्हणाले की, व्हाईट हाऊसमधील झेलेन्स्कीचे वर्तन लज्जास्पद होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT