तेहरान : तेहरानमधील पिरुझी स्ट्रीट परिसरात हवाई हल्ल्यांनंतर धुराचे लोट उठताना दिसत आहेत. File Photo
आंतरराष्ट्रीय

US-Israel attacks | अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात 867 ठार; इराणकडून अधिकृत आकडेवारी जाहीर

पुढारी वृत्तसेवा

तेहरान; वृत्तसंस्था : इराणविरुद्ध सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल लष्करी मोहिमेतील मृतांची संख्या 867 वर पोहोचली आहे. सुमारे 6,000 लोक जखमी झाले आहेत. इराणी आरोग्य अधिकार्‍यांनी ही आकडेवारी पहिल्यांदाच जाहीर केली. शनिवारी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर, इराणने आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर अजूनही 2,100 हून अधिक जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यपूर्वेतील वाढत चाललेल्या संघर्षात मानवी हानीचा आकडा वाढतच आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमानपूर यांनी बुधवारी मृतांची आणि जखमींची ताजी आकडेवारी जाहीर केली. इराणी लेबर न्यूज एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केरमानपूर यांनी पुष्टी केली की, शनिवारपासून सुरू झालेल्या या मोठ्या लष्करी मोहिमेत आतापर्यंत 867 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण

इराणच्या आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या प्रचंड ताणाचे वर्णन करताना केरमानपूर यांनी सांगितले की, जखमी झालेल्या 5,946 नागरिकांपैकी सुमारे 2,184 जणांवर देशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अमेरिका आणि इस्रायलकडून होत असलेल्या भीषण बॉम्बफेकीमुळे प्रभावित भागातील वैद्यकीय सुविधा अपुर्‍या पडत आहेत. सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आरोग्य कर्मचारी जीवापाड मेहनत करून लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT