US-Iran Talks pudhari
आंतरराष्ट्रीय

US-Iran Talks: अमेरिका - इराण चर्चा पाकिस्तानात...? व्हाईट हाऊसने केला मोठा खुलासा

Anirudha Sankpal

US-Iran Talks: अमेरिकेने इराणसोबत ५ दिवसांचा सीजफायर घोषित केला आहे. शांततेसाठी अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा सुरू असून ही चर्चा पाकिस्तानात झाल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता व्हाईट हाऊसने खुलासा केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सीज फायरबाबत इराणने आपली भूमिका स्पष्ट केली असून हा सीज फायर फसवा असल्याचं सांगितलं. त्यांनी अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वॅन्स, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि माजी राष्ट्रपती सल्लागार जारेड कुशनेर यांनी इराणच्या अधिकाऱ्यांशी इस्लामाबादमध्ये भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.

जोपर्यंत व्हाईट हाऊस..

याबाबत एएनआयने प्रश्न विचारताच युएस प्रेस सचिव केरोलिन लिव्हीट यांनी सांगितलं की परिस्थिती अजूनही संवेदनशील आणि प्रवाही आहे त्यामुळं कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचता येणार नाही. त्यांनी अशा प्रकारच्या घडामोडी जोपर्यंत व्हाईस हाऊस अधिकृतरित्या जाहीर करत नाही तोपर्यंत अंतिम समजू नयेत असं उत्तर दिलं.

केरोलिन पुढे सांगितलं की, 'अशा प्रकारच्या संवेदनशील कुटनैतिक चर्चा आणि वाटाघाटी अमेरिका प्रेस मार्फत करत नाही. सध्या परिस्थिती प्रवाही आहे. पाकिस्तानातील बैठकीची चर्चा ही जोपर्यंत व्हाईट हाऊस घोषणा करत नाही तोपर्यंत अंतिम मानण्यात येऊ नये.

इस्लामाबाद संभाव्य ठिकाण?

रायटर्स, फायनाशिय टाईम्स आणि द टाईम्स ऑफ इस्त्रायल यांनी मध्यस्थी करणाऱ्या देशांनी युएस आणि इराण यांना इस्लामाबादमध्ये चर्चा करण्यासाठी मनवलं आहे. याबाबतच्या घडामोडी काही दिवसात दिसतील असे वृत्त दिले होते.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने न्युट्रल व्हेन्यूची ऑफर दिली आहे. त्यांनी अमेरिका आणि तेहरान यांच्याशी त्यांचे चांगले संबंध असल्याचा दावा केला आहे. याबाबत संपर्क करण्यात येत आहे अशी माहिती एका इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं. अशी बैठक आयोजित करण्यासाठी संपर्क साधला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाकिस्तान लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी यांनी देखील युएस अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केल्याचं वृत्त आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे देखील इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन यांच्याशी बोलत असल्याचे वृत्त फायनांशिअल टाईम्सने दिलं आहे.

पडद्यामागून हालचाली मात्र...

काही दिवसात अमेरिका आणि इराण यांच्यातील पडद्यामागील चर्चांना वेग आला आहे. पाकिस्तान, तुर्की आणि इजिप्त हे देश युएस दूत विटकॉफ आणि इराण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.

असं असलं तरी तेहराननं अमेरिकेशी थेट चर्चा करत असल्याचे किंवा वाटाघाटी करत असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. याबाबत इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून काही मित्र राष्ट्रांकडून अमेरिकेची वाटाघाटी करण्याची विनंती मान्य करण्यात यावी यासाठी संपर्क साधला जात आहे. त्यांना योग्य ती प्रतिक्रिया दिली आहे.जाणकारांच्या मते अनेक देश तणाव कमी करावा अशी जोरदार मागणी करत आहे. मात्र हे काही युद्ध संपण्याचे लक्षण नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT