तेहरान ः युद्धविरामाचे जोरदार स्वागत इराणमध्ये बुधवारी करण्यात आले. यानिमित्ताने लोकांनी रस्त्यावर उतरून गगनभेदी घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. 
आंतरराष्ट्रीय

US-Israel Iran War | शस्त्रसंधीसाठी अमेरिका-इराण राजी; कच्च्या तेल दरात मोठी घसरण

पुढारी वृत्तसेवा

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी.सी. : आपल्या आक्रमक धमक्यांनी युद्धज्वर वाढविल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामास अखेर आपली सहमती दिली. शरणागती स्वीकारणार नसल्याचा निर्धार व्यक्त करणार्‍या इराणनेही हा तोडगा मान्य केला. इस्रायलकडेही पर्याय नसल्याने नेतान्याहू यांनाही तो मान्य करणे भाग पडले. अमेरिकेने त्यांच्या वेळापत्रकानुसार मंगळवारी रात्री 8 वाजता करार मान्य करण्याची अंतिम मुदत दिली होती. त्याच्या दीड तास आधी ट्रम्प यांनी ट्विट करून दोन आठवड्यांचा हा युद्धविराम प्रस्ताव मान्य असल्याचे जाहीर केल्याने सर्व जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. अर्थात, हा अल्पकालीन दिलासा ठरणार की वाटाघाटी फिस्कटल्यास पुन्हा युद्ध छेडले जाणार, ही टांगती तलवार अजूनही कायम आहे.

युद्धविरामाच्या वार्तेने जगभरातील शेअर बाजारांचे निर्देशांक वधारले. मुंबई शेअर बाजार आणि निफ्टीने तर गगनाला गवसणी घातली. सर्वात मोठा दिलासा मिळाला तो कच्चे तेल कमालीचे स्वस्त झाल्याने. 100 डॉलर्स प्रतिबॅरल असलेल्या कच्च्या तेलात घसरण होऊन ते 95 डॉलर्स प्रतिबॅरल झाले. भारतीय रुपयाची मानही ताठ झाली. रुपया 41 पैशाने वधारल्याने डॉलर 92.58 रुपये झाला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली करण्याची हमी ट्रम्प यांना हवी होती. त्याला इराणने सशर्त मान्यता देऊन त्याबाबतचे नियोजन जाहीर केले. याआधी काही तासांपूर्वीच ट्रम्प यांनी या महत्त्वाच्या जलमार्गातून मुक्त वाहतूक सुरू करण्यास इराणने परवानगी दिली नाही, तर त्यांच्या संपूर्ण संस्कृतीचा नाश केला जाईल, अशी धमकी दिली होती. एका रात्रीत इराणला बेचिराख करू शकतो, अशी धमकीही त्यांनी त्याआधी दिली होती.

दलाल स्ट्रीटवर दिवाळी; महागाईला लागणार लगाम

बाजारातील या उसळीमुळे केवळ निर्देशांकच वाढला नाही, तर सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. बाजार विश्लेषकांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल, या आशेने गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. यामुळे देशातील गुंतवणूकदारांची एकूण मालमत्ता एकाच दिवसात 17 लाख कोटी रुपयांनी वाढली असून, दलाल स्ट्रीटवर अक्षरशः दिवाळी साजरी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT