Influencer Sarah Gilson Murder pudhari
आंतरराष्ट्रीय

Influencer Sarah Gilson Murder: बापाची त्यांच्या मुलींवरच वाईट नजर... इन्फ्लुएन्सर आईचा आरोप; २ आठवड्यात घडली धक्कादायक घटना

Anirudha Sankpal

Influencer Sarah Gilson Murder: अमेरिकेतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सारा गिलसनची तिच्या पतीने कथितरित्या हत्या केली. त्यानंतर स्वतःचं देखील आयुष्य संपवरून घेतलं आहे. साराचा पती तिच्यापासून वेगळा रहात होता. दोन आठवड्यापूर्वीच साराने आपल्या पतीवर तिच्या मुलांवर लैंगिकदृष्ट्या वाईट नजर होती (Pedophile) असा आरोप केला.

पोलिसांनी सांगितलं की ४३ वर्षाची सारा गिलसन जी सारा डफी या नावाने देखील ओळखली जात होती. तिचा पती ४८ वर्षाचा जेरेमिया शॉन डफी गुरूवारी रात्री ओक्लाहोमाच्या तुलसा जवळ कॉलिन्सविलेमध्ये आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आले होते. साराला गोळी लागली होती. तर तपासात डफी यांनी स्वतःचे जीवन संपवण्यापूर्वी गिलसनला गोळी मारल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणाचा अजून तपास सुरू आहे.

प्रकरण कोर्टात होतं

एनबीसी न्यूजच्या एका रिपोर्टनुसार या घटनेच्या दोन आठवडे पूर्वी गिल्सन यांनी १० जून रोजी डफी यांना त्यांच्या घरापासून दूर ठेवण्यासाठी सुरक्षा आदेशाची मागणी केली होती. कोर्टाच्या रेकॉर्डनुसार त्या दिवशी अजून एका महिलेने देखील अशाच आदेशासाठी अर्ज केला होता. महिलेचा आरोप होता की डफी हा त्यांच्या किशोरवयीन मुलींसोबत चुकीचं कृत्य करत होता.

द ओक्लाहोमन रिपोर्टनुसार कायदेशीर कागदपत्रात असं सांगितलं गेलं की युथ बास्केटब़लच्या एका सहकारी कोडने डफीला मुलींचे चुंबन घेताना आणि चुकीच्या पद्धतीने स्पष्ट करताना पाहिलं होतं. तसेच असा देखील दावे केला जात होता की डफी हा त्यांच्या किशोर वयाच्या मुलांना चुकीचे टेक्स्ट मेसेज देखील पाठवत होता असं त्या मुलींनी त्यांच्या आईला सांगितलं होतं. बास्केटबॉल ट्रीपवेळी त्याने या मुलींना हॉटेलच्या रूममध्ये बोलवलं होतं आणि तिला गप्प राहण्याचे पैसे दिले होते. याबाबतची माहिती ओक्लाहोमा पोलिसांना देण्यात आली होती.

डफीने दिली होती आत्महत्येची धमकी

गिल्सनने कोर्टात अर्ज केला होता त्यात डफीवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये त्याच्याजवळ शस्त्र असल्याचा देखील दावा करण्यात आला होता. त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती आणि तो पळून होता. त्यानंतर एका महिन्याने ११ जुलै रोजी गिलसनने आपल्या हजारो फॉलोअर्ससोबत एक टिकटॉक व्हिडिओ शेअर केला होता.

या व्हिडिओत ती म्हणते की, 'नेटफ्लिक्स माझ्या माजी पतीबद्दल एक डॉक्युमेंट्री घेऊन येणार आहे. तो एक पीडोफाईल आहे हे मला आताच कळालं आहे. त्यामुळं मी त्याची तयारी करत आहे.'

१२ दिवसांनी घडली मोठी घटना

या व्हिडिओनंतर बरोबर १२ दिवसांनी गुरूवारी रात्री जवळपास ११.१५ वाजता पोलिसांना कॉलिंसविले येथील एका घरातून ९११ कॉला आला. कॉल कट होण्यापूर्वी डिस्पॅचरने एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. त्यानंतर गोळी चालवण्याचा देखील आवाज झाला होता.

पोलिसांनी सांगितलं की काही वेळातच शेजारील एका मुलाने ९११ कॉल केला आणि डिस्पॅचरला सांगितलं की त्याच्या सावत्र बापाने त्याच्या आईला गोळी मारली आहे. ज्यावेळी पोलीस अधिकारी तिथं पोहचले त्यावेळी गिलसन आणि डफी मृत आढळून आले होते. त्यांच्या डोक्यावर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. अधिकाऱ्यांच्या मते हा हत्या आणि त्यानंतर स्वतःचे जीवन संपवण्याचे प्रकरण आहे. अजून याबाबत तपास सुरू आहे.

गिल्सनच्या मुलाला सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतले असून त्याला दुसऱ्या आई वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा आणि मुलगी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT