US Armada Against Iran | इराणविरुद्ध अमेरिकेचे ‘आर्माडा’ तैनात 
आंतरराष्ट्रीय

US Armada Against Iran | इराणविरुद्ध अमेरिकेचे ‘आर्माडा’ तैनात

पुढारी वृत्तसेवा

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणकडे मोठ्या प्रमाणात नौदल तैनात केले आहे. दोन विमानवाहू नौका आणि अनेक विनाशिका जहाजांसह उभी केलेली ही ‘आर्माडा’ केवळ लष्करी हालचाल नसून, एक स्पष्ट रणनीतिक संदेश मानला जात आहे. वॉशिंग्टनकडून इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू असून, आंदोलकांच्या संरक्षणाचा मुद्दाही पुढे केला जात आहे. तथापि, सध्याची तैनाती व्यापक युद्धासाठी नसून, मर्यादित आणि दंडात्मक कारवाईकडे झुकणारी असल्याचे संकेत तज्ज्ञ देत आहेत. ऐतिहासिक मोहिमांशी तुलना केल्यास ही शक्ती निर्णायक राजवट बदलासाठी अपुरी दिसते.

1. पुन्हा संघर्षाची चाहूल

ऑपरेशन मिडनाईट हॅमरनंतर केवळ आठ महिन्यांत अमेरिका पुन्हा इराणवर कारवाईस सज्ज.

मध्य पूर्व व पूर्व भूमध्य समुद्रात 2 विमानवाहू नौका

+ 16 युद्धनौका तैनात.

2003 मधील ऑपरेशन इराण फ्रिडमनंतरचा

हा सर्वात मोठा नौदल जमाव.

मात्र, दीर्घकालीन युद्धासाठी आवश्यक मरीन,

विशेष दल आणि व्यापक सामरिक क्षमता अपुरी.

अमेरिकेची धमकी आणि राजकीय संदेश

* 2 जानेवारीला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांच्या संरक्षणाचा इशारा दिला.

* इराणने अण्वस्त्र कार्यक्रम सोडावा; अन्यथा कारवाईचा इशारा.

* मॅसिव्ह अर्माडा इराणकडे रवाना केला असल्याचे जाहीर.

सध्याची लष्करी ताकद विरुद्ध ऐतिहासिक मोहिमा

मोहीम नौदल शक्ती पातळी

ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म अत्यंत मोठी (6 विमानवाहू नौका)

ऑपरेशन इराकी फ्रिडम 5 विमानवाहू नौका

ऑपरेशन डेझर्ट फॉक्स मर्यादित 4 दिवसांची बॉम्बहल्ला मोहीम

आजची तैनाती 2 विमानवाहू, 13 विध्वंसक, 3 लहान युद्धनौका

निष्कर्ष : सध्याची ताकद डेझर्ट फॉक्ससारख्या मर्यादित कारवाईस सक्षम; पण राजवट बदलासाठी अपुरी

मर्यादा आणि संभाव्य परिणाम

मर्यादा

मरीन आणि विशेष दलांची अनुपस्थिती; जमिनीवरील कारवाई कठीण

दीर्घकालीन हवाई मोहिमेसाठी अपुरी लॉजिस्टिक तयारी

इराणी नेतृत्वाला लक्ष्य करणे धोकादायक व प्रतिशोधाची शक्यता

संभाव्य कारवाई

150250 टॉमहॉक क्षेपणास्त्र प्रक्षेपण

अणुस्थळे व रिव्होल्युशनरी गार्डस् ठिकाणांवर हल्ले

मर्यादित, दंडात्मक आणि अल्पकालीन मोहीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT