आंतरराष्ट्रीय

अमेरिकेची पाकला धमकी; भारतावर दहशतवादी हल्‍ला झाल्‍यास परिणाम गंभीर

Pudhari News

नवी दिल्‍ली  : पुढारी ऑनलाईन 

भारतावर आणखी एखादा दहशतवादी हल्‍ला झाल्‍यास त्‍याचे गंभीर परिणाम पाकिस्‍तानला भोगावे लागतील, अशी तंबी अमेरिकेने पाकिस्‍तानाला दिली आहे. पाकने त्‍यांच्‍या देशातील दहशतवादी संघटनाविरोधान कठोर भूमिका घ्‍यावी. तसेच भारतात तणाव निर्माण करु नये, याची दक्षता घेण्‍याची गरज असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. 

अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील एका वरिष्‍ठ अधिकार्‍यांने  दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने प्रामुख्याने जैश-ए- मोहम्मद आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी भूमिका अमेरिकेनी घेतली आहे. जर भारतात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला आणि यामागे पाकमधील दहशतवादी संघटनेचे हात असल्यास याचे पाकला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा कडक शब्‍दात अमेरिकेकडून खडसावण्‍यात आले आहे. 

याविषयी आधिक माहिती देताना व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी सांगितले आहे की, पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र ही भूमिका अजून कठोर करण्‍याची गरज आहे.  यापूर्वीही पाककडून  दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना नजरकैदेत ठेवले आणि काही महिन्यांनी त्यांची सुटका केली. काही नेत्यांना तर देशभरात फिरण्याची आणि जाहीर सभा घेण्याचीही  खुलेआम परवानगी देण्‍यात आली आहे. 

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटना तळ टोकून आहेत. पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती पाहता आणि एक जबाबदार देश म्हणून त्यांना जगात ओळखले जावे असे पाकिस्‍तानलाटत असेल तर त्यांनी आता या तळांवर कारवाई केलीच पाहिजे असे दिखेल अमेरिकेकडून पाकला सांगण्‍यात आले आहे. 

अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील एका वरिष्‍ठ अधिकार्‍यांने  दिलेल्या माहितीनुसार,  तसेच पाकिस्‍ताकडून दहशतवादा विरोधात घेतलेल्‍या भूमिकेबद्दल आता प्रतिक्रिया देणे घाईचे ठरेल.  यासंबंधी पाकने सुरुवात केली आहे. यामध्‍ये काही दहशतवादी संघनटाची संपत्ती जपत करण्‍यात आली आहे तर काहींना अटक करण्‍यात आली आहे. पाककडून अजून कठोर भूमिका घेण्‍याची गरज असल्‍याचे सांगण्‍यात आले आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान या दोन्‍ही देशात तणावाची परिस्‍थिती निर्माण झाली आहे. 

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT