UAE Stop Visa for Pakistani Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

UAE Stop Visa for Pakistani: तस्करी, भीक मागण्याचे प्रकार... युएईनं पाकिस्तानी नागरिकांना Visa देणं थांबवलं

युएईनं व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना पोलिसांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट जोडणे बंधनकारक केलं होतं.

Anirudha Sankpal

UAE Stop Visa for Pakistani:

पाकिस्तान जगभरात कितीही सभ्यतेचा आव आणत असला तरी कधी ना कधी त्याचे खरे गुण जगासमोर येतातच. असेच गुन्हेगारी प्रवृत्ती आणि सतत भीक मागण्याची सवय यामुळं पाकिस्तानला पुन्हा एकदा नाचक्कीला सामोरं जावं लागलं आहे. युनायटेड अरब अमिरातनं पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा जारी करणं थांबवलं आहे. याचं भन्नाट कारणही त्यांनी दिलं असून युएईमधील गुन्हेगारी कृत्यात पाकिस्तानी नागरिकांचा सहभाग वाढल्यामुळं युएईनं हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे अतिरिक्त गृह सचिव सलमान चौधरी यांनी ह्युमन राईट्सच्या सिनेट फंक्शनल कमिटीसमोर ही बाब उघड केली. चौधरी यांनी एकदा का बंदी आली की ती पुन्हा उठवणं कठीण जातं. याबाबतचं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमध्ये छापून आलं आहे.

पाकिस्तानी लोकं भीक मागतात...

परदेशी रोजगार प्रमोटर इसम बेग यांनी सांगितलं की युएई सरकारने प्रवासी व्हिसावर आलेले पाकिस्तानी लोकं आमच्या देशात येऊन भीक मागतात. त्यामुळं युएई सरकारनं सध्या पाकिस्तानला फक्त ब्लू आणि डिप्लोमॅटिक व्हिसा देण्यास सुरूवात केली आहे.

पाकिस्तानी खासदार समिना मुमताझ झेहरी ज्या संसदीय मानव अधिकार समितीच्या अध्यक्षा आहेत त्यांनी फक्त काही लोकांनाच युएई व्हिसा देत आहे असं सांगितलं.

कॅरेक्टर सर्टिफिकेट बंधनकारक...

यापूर्वी युएईनं व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना पोलिसांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट जोडणे बंधनकारक केलं होतं. पाकिस्तानी प्रवासी आणि रोजगाच्या शोधात असलेल्या लोकांची आखाती देशांना विशेषकरून दुबई आणि अबू धाबी या शहरांना जास्त पसंती असते.

दर वर्षी आखाती आणि मध्य पूर्व देशांचा व्हिसा मिळावा म्हणून जब्बल ८ लाख पाकिस्तानी नागरिकांनी अर्ज करतात. डिसेंबर २०२४ मध्ये युएई, सौदी अरेबिया आणि अजून काही गल्फ देशांनी पाकिस्तानमधील ३० पेक्षा जास्त शहरातील नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली होती.

तस्करीतही पाकिस्तानी अव्वल

हा निर्णय या देशात पाकिस्तानी लोकं भीक मागणे, तस्करी आणि ड्रग्ज तस्करी, मानवी तस्करी आणि इतर गुन्हेगारी कृत्यात सामील होते.

दरम्यान पॉडकास्टर नादीर अली यांनी मुलाखतीत सांगितलं की, 'सौदी अरेबिया आणि दुबई ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. मात्र यांनी पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं थांबवलं आहे. मला IIFA Awards साठी व्हिसा हवा होता त्यावेळी मला देखील खूप अडचणी आल्या होत्या. एवढंच नाही तर सौदी अरेबियाने भीक मागण्याच्या गुन्ह्यात पाकिस्तानी नागरिकांची वाढलेल्या संख्येवरून पाकिस्तानला इशारा देखील दिला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT