Joe Biden
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन  File Photo
आंतरराष्ट्रीय

"युक्रेन युद्धात रशिया ठरत आहे अपयशी, कोणतीही चूक करू नका"

पुढारी वृत्तसेवा

अमेरिका आणि त्याचे मित्र देश येत्या काही महिन्यांत युक्रेनला अनेक अतिरिक्त हवाई-संरक्षण प्रणाली प्रदान करणार आहेत. युक्रेन युद्धात रशिया अपयशी ठरत आहे. त्‍यामुळे कोणतीही चूक करू नका, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आज (दि. १०) केले. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) च्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शिखर परिषदेत NATO सदस्य देशांच्या नेत्यांचे स्वागत करताना ते बोलत होते.

या वेळी ज्‍यो बायडेन म्‍हणाले की, अमेरिका, जर्मनी, नेदरलँड्स, रोमानिया आणि इटली, युक्रेन या देशांना पाच अतिरिक्त मरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण हवाई विमाने मिळणार आहेत. अमेरिका आणि त्याचे भागीदार येत्या काही महिन्यांत युक्रेनला अनेक अतिरिक्त हवाई-संरक्षण प्रणाली प्रदान करण्याची योजना आखत आहेत.'आम्ही गंभीर हवाई-संरक्षण प्रणाली पाठवतो तेव्हा युक्रेन आघाडीवर असल्याची खात्री अमेरिका करेल'

350,000 हून अधिक रशियन सैनिक ठार

या वेळी बायडेन म्‍हणाले, नाटो देशांनी आता कोणतीही चूक करू नका, रशिया या युद्धात अपयशी ठरत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध निवडले याला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या देशाचे झालेले नुकसान धक्‍कादायक आहे. 350,000 हून अधिक रशियन सैनिक ठार किंवा जखमी झाले आहेत. देशात कोणतेही भविष्‍य नसल०याने 1 दशलक्ष रशियन नागरिकांनी देश सोडला आहे, असा दावाही त्‍यांनी केला.

युक्रेन पुतिन यांना रोखू शकतो

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, 'पुतीन युक्रेनमध्ये थांबणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे;पण कोणतीही चूक करू नका, युक्रेन पुतिन यांना रोखू शकतो, असा विश्‍वासही यावेळी बायडेन यांनी व्‍यक्‍त केला.

कोणत्याही युद्धात जोखीममुक्त पर्याय नसतो : जेम्स स्टॉल्टनबर्ग

नाटोचे सरचिटणीस जेम्स स्टॉल्टनबर्ग म्हणाले की, "शेजारी म्हणून रशियाशी व्यवहार करण्यासाठी कोणताही पर्याय नाही. कोणत्याही युद्धात जोखीममुक्त पर्याय नसतो. जर रशिया युक्रेनमध्ये जिंकला तर सर्वात मोठी किंमत आणि सर्वात मोठा धोका येईल. आम्ही हे होऊ देऊ शकत नाही. हे केवळ राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनाच नव्‍हे तर इराण, उत्तर कोरिया आणि चीनमधील इतर निरंकुश नेत्यांनाही प्रोत्साहन देईल, अशी भीतीही नी वयक्‍त केली.

SCROLL FOR NEXT