युक्रेनने डागलेली ४५ ड्रोन पाडण्यात आल्‍याचा दावा रशियाने केला आहे.  File Photo
आंतरराष्ट्रीय

युक्रेनचा मॉस्‍कोवर आतापर्यंतचा मोठा ड्रोन हल्‍ला

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील अडीच वर्षांहून अधिक काळ सुरु असणारे रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र झाले आहे. दोन्ही देश आपल्‍या भूमिकेवर ठाम आहेत. आता युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला असल्‍याचा दावा मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी केल्‍याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. आहे. मॉस्को भागात 11 ड्रोन नष्ट करण्‍यात आले. तर देशभरात एका रात्रीत ४५ ड्रोन पाडण्यात आल्‍याचे रशियन सैन्‍य दलाच्‍या अधिकार्‍यांनी म्‍हटलं आहे.

 माॅस्‍काेवर हल्ला करण्याचा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रयत्न

रशियाच्या हद्दीत नष्ट करण्यात आलेल्या 45 ड्रोनपैकी 11 मॉस्कोमध्ये, 23 ब्रायन्स्कच्या सीमा भागात, ६ बेल्गोरोड प्रदेशात, तीन कलुगा आणि दोन कुर्स्क प्रदेशात नष्ट करण्यात आले. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, पोडॉल्स्क शहरावर काही ड्रोन नष्ट करण्यात आले. मॉस्कोवर हल्ला करण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्राेन हल्‍ला हाेता. मॉस्कोच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे ड्रोन हल्ले यशस्वीपणे हाणून पाडले, असेही सर्गेई सोब्यानिन यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

युक्रेनच्‍या सैन्याची पश्चिम रशियाच्या हद्दीत घुसखोरी

रशियन प्रसारमाध्यमांनी मॉस्को प्रदेशात पहाटे उडणाऱ्या ड्रोनच्‍या फुटेजबराेबर रशियन संरक्षण दलांनी ड्राेन पाडल्‍याचे व्‍हिडिओ प्रसारित केले. युक्रेनने केलेल्‍या ड्रोन हल्ल्यांमुळे मॉस्कोच्या वनुकोवा, डोमोडेडोवा आणि झुकोव्हस्की विमानतळावरील उड्डाणे चार तासांहून अधिक काळ ठप्‍प राहिली. दरम्‍यान, युक्रेनचे सैन्य पश्चिम रशियाच्या हद्दीत घुसखोरी करत आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढत आहे. दोन्ही बाजूंनी सतत हल्ले सुरू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT