रशियातील सेराटोव्हमधील ३८ मजली निवासी इमारतीला आज (दि. २६) सकाळी युक्रेनच्‍या ड्रोनने धडक दिली.  File photo
आंतरराष्ट्रीय

युक्रेनचा रशियावर 9/11 सारखा हल्‍ला! ३८ मजली इमारतीला ड्रोनची धडक

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रशियातील सेराटोव्‍ह येथे युक्रेनने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर ११ सप्‍टेंबर २००१ रोजी झालेल्‍या हल्‍ल्‍यासारखाच हल्‍ला केला. सेराटोव्हमधील ३८ मजली निवासी इमारतीला आज (दि. २६) सकाळी ड्रोन धडकले. या हल्‍ल्‍यात दोन जण जखमी झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे. दरम्‍यान, हे ड्रोन हल्ले युक्रेनने केल्याचा दावा मॉस्कोच्या गव्हर्नर करत आहेत. यावर युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ( Russia-Ukraine war)

रिपोर्टनुसार, युक्रेनच्या लष्कराने रशियातील सेराटोव्ह येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केले. एंगेल्समध्ये रशियाचा लष्करी तळ आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने अनेकवेळा त्यावर हल्ले केले आहेत.या हल्ल्यात इमारतीच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इमारतीखाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

युक्रेनचे नऊ ड्रोन नष्ट केल्याचा रशियाचा दावा

रशियन संरक्षण मंत्रालयाने म्‍हटलं आहे की, साराटोव्हमध्ये युक्रेनची ९ ड्रोन पाडण्‍यात आली. युक्रेन सीमेपासून सेराटोव्हचे अंतर 900 किमी आहे. या हल्ल्यानंतर सर्व प्रकारच्या हवाई हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.साराटोव्ह प्रदेशात नऊ ड्रोन नष्ट करण्‍यात आली आहेत. एंगेल्समध्ये रशियाचा एक रणनीतिक बॉम्बर लष्करी तळ आहे ज्यावर मॉस्कोने फेब्रुवारी 2022 मध्ये पूर्ण-प्रमाणात आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनने अनेक वेळा हल्ले केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT