US Iran Conflict
वॉशिंग्टन : इराणसोबत वाढता तणाव आणि 'बॅकचॅनल' चर्चेच्या चर्चांदरम्यान व्हाईट हाऊसच्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अमेरिकेकडून जारी करण्यात आलेला हा संदेश केवळ एक 'मोटिव्हेशनल लाईन' नसून इराणबरोबर संघर्ष कयम असतानाच केली गेल्याने याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सोमवारी व्हाईट हाऊसने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक फोटो शेअर करत लिहिले की, "लॉक्ड-इन मोड: ॲक्टिव्हेटेड, नो एक्सक्यूज, जस्ट विन" अशा तणावपूर्ण काळात व्हाईट हाऊसच्या या पोस्टने एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. इराण चर्चेच्या वाटेवर आपली भूमिका स्पष्ट करत नसेल, तर अमेरिका काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहे का?
ट्रम्प सोमवारी तेहरानमध्ये काही मोठी कारवाई करणार आहेत का? इतकेच नाही तर इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी अमेरिकेचा हा शेवटचा इशारा (अल्टिमेटम) आहे का? असे सवालही या पोस्टमुळे विचारले जात आहेत.
इराणसोबत सुरू असलेला तणाव आणि चर्चेच्या शक्यतांदरम्यान 'लॉक्ड-इन मोड: ॲक्टिव्हेटेड' सारख्या ओळींना साधारण संदेश मानले जाऊ शकत नाही. याकडे एक कडक आणि आक्रमक संकेत म्हणून पाहिले जात आहे. अशी भाषा सहसा तेव्हा वापरली जाते जेव्हा एखादा देश आपली रणनीती निश्चित करतो आणि आता मागे हटण्याऐवजी निर्णायक पाऊल उचलण्याच्या तयारीत असतो.
लॉक्ड-इन मोड: याचा अर्थ आहे पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि सज्ज राहणे.नो एक्सक्यूज, जस्ट विन: याचा अर्थ असा की, लक्ष्य गाठण्यासाठी अमेरिका आता कोणतीही शिथिलता दाखवणार नाही.इराणच्या संदर्भात याचा अर्थ असा लावला जात आहे की, अमेरिका आता कठोर भूमिका घेण्याच्या स्थितीत असून दबाव वाढवण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या निर्णयाकडे वाटचाल करत आहे. अद्याप कोणत्याही अधिकृत लष्करी कारवाईची घोषणा झालेली नसली, तरी असे शब्द सूचित करतात की परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि पुढील रणनीती आक्रमक असू शकते.