Donald Trump Speech pudhari
आंतरराष्ट्रीय

Trump Warns | इराणला शस्त्रास्त्रे पुरवली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

ट्रम्प यांचा चीन, रशियाला इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन आणि रशिया इराणला तुमच्याकडून शस्त्रास्त्रांची मदत करत असल्याचे आढळल्यास तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्याचवेळी आपण दोन्ही देशांच्या नेत्यांवर विश्वास ठेवतो, कारण त्यांनी इराणला शस्त्रास्त्रे पुरवत नसल्याचे सांगितले आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी रशिया आणि चीन इराणला सहाय्य करत असल्याचे खासदारांना सांगितल्यानंतर, ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर आपले मत मांडले. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, बीजिंग येथे आमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मला सांगितले होते की, ते कोणत्याही परिस्थितीत इराणला शस्त्रास्त्रे देणार नाहीत किंवा विकणार नाहीत, यामध्ये चिनी कंपन्यांचाही समावेश आहे. त्यांनी पुढे नमूद केले, आमच्या संबंधांचा विचार करता मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवतो, शिवाय मी त्यांना खूप मोठे फायदेही मिळवून देत आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही मला सांगितले होते की ते इराणला शस्त्रे विकणार नाहीत. ट्रम्प पुढे म्हणाले, मी युक्रेनला शस्त्रे विकत नाही, तर नाटो देशांना विकतो. ते पूर्ण किंमत देतात आणि ती शस्त्रे कशी वितरित केली जातात, याची मला कल्पना नाही.

इराणला रशिया आणि चीनकडून मदतीचा हेगसेथ यांच्याकडूनही दुजोरा

‘द हिल’ वृत्तसंस्थेनुसार, संरक्षण सचिव हेगसेथ यांनी खासदारांना सांगितले होते की, रशिया आणि चीन वेगवेगळ्या स्तरांवर इराणला मदत पुरवत आहेत. संयुक्त मुख्यालयाचे प्रमुख जनरल डॅन केन यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला होता, मी तपशिलांवर भाष्य करणे टाळू इच्छितो, कारण त्यामुळे आपल्याला काय माहीत आहे हे शत्रूला समजेल. मला हे अजिबात"नको आहे, असे ते म्हणाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT