Trump NATO Exit | ‘नाटो’तून बाहेर पडण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत 
आंतरराष्ट्रीय

Trump NATO Exit | ‘नाटो’तून बाहेर पडण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

‘नाटो’ म्हणजे कागदी वाघ अशा शब्दात संभावना

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : नाटोमधून बाहेर पडण्याचा अमेरिका गांभीर्याने विचार करत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी नाटोला ‘कागदी वाघ’ असे संबोधत या अनेक राष्ट्रांच्या लष्करी संघटनेवर कठोर टीका केली. इराणविरुद्धच्या युद्धात नाटो देशांनी साथ न दिल्यामुळे व्हाईट हाऊसची नाराजी वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गातून जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक होते. इराणने हा मार्ग बंद केल्यामुळे तेल व गॅसचे दर वाढले असून जागतिक मंदीची भीती व्यक्त होत आहे. नाटो देशांनी या मार्गाचे संरक्षण करण्यासाठी युद्धनौका पाठवण्यास नकार दिल्याने अमेरिकेचा रोष वाढला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान केरी स्टार्मर यांच्यावर ट्रम्प यांनी थेट टीका केली. ब्रिटिश नौदल कमकुवत असल्याचा आरोप करत त्यांनी ब्रिटनच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, संरक्षण खर्च वाढवण्याऐवजी महागड्या वार्‍याच्या ऊर्जेवर भर दिल्याचा टोला त्यांनी लगावला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनीही नाटोवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी नाटोला ‘वन-वे स्ट्रीट’ म्हणत अमेरिकेला आवश्यक असताना सहयोगी देशांनी लष्करी तळ उपलब्ध करून दिले नाहीत, असा आरोप केला. इराण युद्ध संपल्यानंतर अमेरिका नाटो संबंधांचा पुनर्विचार करेल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT