Donald Trump | रशियन तेल खरेदी करण्याला मुदतवाढीस ट्रम्प यांचा नकार; भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका File Photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | रशियन तेल खरेदी करण्याला मुदतवाढीस ट्रम्प यांचा नकार; भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : इराणच्या युद्धादरम्यान रशियाकडून कच्चे इंधन तेल खरेदी करण्याची मुभा अमेरिकेने दिली होती. त्यास मुदतवाढ देण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. यामुळे देशातील इंधनाच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली; मात्र अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दबावतंत्राचा वापर म्हणून होर्मुझमधून इराणच्या तेल वाहतुकीची नाकाबंदी केली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या काळात रशियन तेल खरेदीवर अमेरिकेकडून मुभा देण्यात आली होती. आता ती रद्द केल्याने कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊन भारतासह जगभरात महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मार्च 2026 मध्ये इराण युद्ध सुरू झाल्याने आणि होर्मुझ बंद झाल्याने जागतिक बाजारातील तेल संकट गडद झाले आहे. तेलाच्या तुटवड्यामुळे ट्रम्प सरकारने मार्च 2026 मध्ये सूट दिली होती.

जागतिक तेल बाजारावर दबाव वाढणार

रशिया जगातील कच्च्या तेलाच्या मोठ्या निर्यातदार देशांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. कच्च्या तेलाचे दर दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर पडू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT