Trump tariff warning | टॅरिफ वाढविण्याचा ट्रम्प यांचा नवा इशारा; जगभरातील देशांची डोकेदुखी वाढली Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

Trump tariff warning | टॅरिफ वाढविण्याचा ट्रम्प यांचा नवा इशारा; जगभरातील देशांची डोकेदुखी वाढली

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयावर तोंडसुख घेतानाच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता वाढीव आयात शुल्क (टॅरिफ) लागू करण्याचा इशारा आपल्या व्यापारी भागीदार देशांना दिला आहे.

यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी न्यायालयाचा निर्णय ‘अपमानास्पद’ असल्याची टिपणी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्या अधिकारांमध्ये उलट वाढच झाल्याचा दावा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट करत ट्रम्प यांनी टॅरिफ कायदेशीर मार्गाने लागू करण्याचा निर्धार व्यक्त केला. मात्र, त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.

ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हास्यास्पद आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत विभाजनकारी निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी ताकद पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. मी आता ‘लायसन्स’चा वापर करून इतर देशांविरोधात, विशेषतः गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेचा गैरफायदा घेणार्‍या देशांविरोधात, अत्यंत कठोर पावले उचलू शकतो.

ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयानुसार मी इतर देशांकडून लायसन्स फी घेऊ शकत नाही. मात्र, प्रत्येक लायसन्ससोबत शुल्क असते, मग अमेरिका असे का करू शकत नाही? न्यायालयाने इतर सर्व टॅरिफना मंजुरी दिली आहे आणि ते टॅरिफ पूर्वी वापरण्यात आलेल्यांपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली पद्धतीने लागू करता येऊ शकतात, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT