Peru Plane Crash | पेरूमध्ये विमान कोसळून १३ पर्यटक ठार 
आंतरराष्ट्रीय

Peru Plane Crash | पेरूमध्ये विमान कोसळून १३ पर्यटक ठार

नाझ्का लाईन्सवरून परतताना दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

लिमा; वृत्तसंस्था : पेरूमधील जागतिक प्रसिद्ध नाझ्का लाईन्स परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारे लहान पर्यटन विमान कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ विदेशी पर्यटक, वैमानिक आणि सहवैमानिक यांचा समावेश आहे. अपघातानंतर परिसरात बचावकार्य सुरू असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे विमान इका शहरातून उड्डाण करून नाझ्का लाईन्सवरील हवाई पर्यटन फेरीसाठी गेले होते. पर्यटन फेरी पूर्ण करून विमान नाझ्का विमानतळावर उतरण्यासाठी येत असताना त्याचा नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क तुटला. त्यानंतर विमान शहराजवळ शेतात कोसळले. विमानात ११ विदेशी पर्यटक आणि दोन कर्मचारी होते. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, मृत पर्यटकांमध्ये जर्मनीचे दोन, स्पेनचे दोन आणि इटलीचे सात नागरिक होते. हे विमान 'एरोडियाना' या पेरूच्या विमान कंपनीचे असून, ही कंपनी गेल्या १४ वर्षांपासून सेस्ना ग्रँड कॅरव्हॅन विमानांद्वारे नाझ्का लाईन्सवर पर्यटन फेऱ्या आयोजित करत आहे.

अपघाताच्या आदल्या दिवशी या परिसरात वाळूचे वादळ आले होते. मात्र, या घटनेचा अपघाताशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पेरूच्या विमान वाहतूक आणि संबंधित यंत्रणांनी दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT