आंतरराष्ट्रीय

TikTok ला आणखी एक जबर झटका!

Pudhari News

बिजिंग : पुढारी ऑनलाईन 

भारताची चीनने गलवान खोऱ्यात कुरापत काढल्यानंतर मोठी हिंसक झडप झाली. यामध्ये २० भारतीय जवान शहीद  झाले. यानंतर केंद्र सरकारकडून अनेक चीनी ॲप भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्यात आली. त्यामध्ये टीकटॉकचाही समावेश होता. त्यामुळे टिकटॉकला जबर किंमत मोजावी लागली. 

अधिक वाचा : अमेरिकेची हेरगिरी करणारी विमाने घुसली चीनच्या हद्दीत 

यानंतर आता आणखी एक जबर हादरा TikTok ला बसला आहे. TikTok चे सीईओ केवीन मेयर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमेरिकेच्या प्रचंड दबावाखाली त्यांनी राजीनामा दिला आहे. TikTok ॲप विकण्यासाठी अमेरिकेकडून दबावतंत्र सुरु आहे. 

अधिक वाचा : दाऊदच्या पाकिस्तानी गर्लफ्रेंडला शिव्यांचा भाडिमार!

मेयर यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राजकीय वातावरण अचानक ढवळून निघाल्याने सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मेयर यांनी हा निर्णय घेतला आहे. TikTok ची मूळ कंपनी असलेल्या ByteDance ला ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन बाजारपेठ अमेरिकन कंपनीला न विकल्यास ९० दिवसांत TikTok बॅन करण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव TikTok अमेरिकेतून चालवण्यासाठी हा इशारा देण्यात आला आहे. 

अधिक वाचा : हावडी मोदी ते नमस्ते ट्रम्प! दोन्ही कार्यक्रमाचा ट्रम्प यांच्या प्रचारात खूबीने वापर करण्यास सुरुवात!

मेयर यांनी ईमेल पाठवून आपला राजीनामा जाहीर केला आहे. कंपनीच्या सरव्यवस्थापक व्हेनेसा पप्पस हे मेयर यांच्या जागी अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतील. यावर्षी मे महिन्यात त्यांनी हे पद स्वीकारले. यापूर्वी ते डिस्ने येथे कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT