पुढारी ऑनलाईन डेस्क
एरवी तलवारीने केक कापणाऱ्यांची पोलिस काय हालत करतात ते आपल्याला वेगळे सांगायला नको. भर चौकात तलवारीने केक कापून दहशत माजवणे हा हेतू असतो. पण आज दिवसभर एका व्हिडिओची चर्चा आहे ती, इंग्लंडच्या राणीने चक्क तलवार हातात घेतली आणि भोजन समारंभात केक कापला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
वाचा : जेफ बोजोस यांच्या जवळच्या 'खुर्ची'साठी मोजले २०५ कोटी!
जगभरात सतावणारा हवामान बदलाचा प्रश्न आणि कोविड १९ महामारीसारख्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी जी ७ शिखर परिषदेचे इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या मध्यंतरात भोजन समारंभात इडन प्रोजेक्ट कॉम्प्लेक्समध्ये महाराणी एलिजाबेथ यांनी तलवारीने केक कापला.
कॉर्नवाल येथे जी ७ या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. ११ ते १३ जून दरम्यान या परिषदेचे कार्बिस बे येथे आयोजन केले होते. या परिषदेत जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी हवामान बदल आणि कोविड १९ चा सामना करत असताना आपल्यासमोर असलेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते.
या परिषदेच्या समारोपानंतर आयोजित करण्यात आलेल्या बिग लंचमध्ये महाराणी एलिजाबेथ सहभागी झाल्या. यावेळी त्यांना केक कापण्याचा आग्रह करण्यात आला. त्यावेळी त्यांनी तलवारीने केक कापला.
वाचा : फक्त १२ रुपयात घर घ्या आणि लोकसंख्या वाढवा! कोणत्या देशाने दिली भन्नाट ऑफर?