पुढारी ऑनलाईन डेस्क
जोडीदार असल्याशिवाय लैंगिक समाधान मिळत नाही. सेक्स करण्यासाठी जोडीदार असावाच लागतो. असं सांगितलं जातं. परंतु हे तितकं खरं नाही. कारण, 'हस्तमैथुन' केल्यानेही आपलं लैगिंक आयुष्य निरोगी राहतं, ही बाब संशोधनातून स्पष्ट झाली आहे. हस्तमैथुन केल्याने आपल्या शरीराच्या दृष्टीने नेमके कोणते फायदे मिळतात? हे सविस्तर पाहू या…
मनावरचा ताण कमी होतो
टोरोंटोमधील प्रसिद्ध सेक्स थेरेपिस्ट जुदीथ गोल्डन असं सांगतात की, "हस्तमैथुन केल्याने भरकटलेलं मन एक विचारावर स्थिर राहतं. त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. सेक्सबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मेंदूमध्ये 'डोपामाईन' नावाचं रसायन तयार होते. ते रसायनच आपल्याला आनंद प्राप्त करून देते. सेक्स्युअल एक्टिव्हिटी करत असताना शरीरातील एंडोर्फिन मुक्त होता. त्यामुळे मनदेखील स्थिर झाल्यासारखे वाटते. परंतु, आपल्याला रिलॅक्स वाटतं म्हणून सातत्याने हस्तमैथुन करण्याची सवय लागणार नाही, याची काळजी घ्या."
मासिक पाळीचा त्रास कमी होतो
मासिक पाळीमुळे काही दिवसांसाठी महिलांच्या ओटीपोटात दुखत असते. तो त्रास कमी करण्यासाठी हस्तमैथुन मदत करते. जुदीथ गोल्डन सांगतात की, "हस्तमैथुन केल्यानंतर तीव्र उत्तेजनातून आणि ऑर्गेझमच्या क्षणातून हार्मोन्स शरीरात हार्मोन्स साडले जातात. त्यातून आनंद मिळतो. हाच आनंद ओटीपोटाचा त्रास कमी करण्यास मदत करतो. पण, एक गोष्ट लक्षात घ्या की, हे प्रत्येक महिलेच्या बाबतीत लागू होतंच असं नाही. त्यासाठी तुमचं शरीर तुम्हाला कोणते संदेश देताहेत ते पहा आणि ती क्रिया करा.
माणूस लैंगिकतेशी जोडून राहतो
तुम्हाला माहिती आहे की, प्रत्येक जण लैंगिक आयुष्यात सेक्ससंदर्भात मोठी डील करतो. कारण, त्याला त्याची सेक्स लाईफ सुधारायचे असते. सेक्स थेरेपिस्ट जुदीथ गोल्डन सांगतात की, "सेक्स करताना महिलेला ऑर्गेझम किंवा परमोच्च सुखाचा क्षण प्राप्त झाली नाही, तर त्यांना तो आनंद मिळविण्यासाठी हस्तमैथुन करावे, असा सल्ला सगळेच सेक्स थेरेपिस्ट देतात. त्यामुळे कोणती सेक्स्युअल एक्टिव्हिटी करताना तुम्हाला समाधान मिळते, ती एक्टिव्हिटी जरूर करा. आता कोणत्या एक्टिव्हिटीमध्ये महिलांना आनंद मिळू शकते, त्याबद्दल निश्चित सांगू शकत नाही.
ऑर्गेझम लवकर मिळतो
"तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर सेक्स करताना ऑर्गेझमचा आनंद मिळू शकत नसेल. तर, पहिल्यांदा त्यावर उपाय शोधण्यास सुरुवात करा. तुम्ही सातत्याने हस्तमैथुन करत असाल, तर त्यातून तुमचं शरीर सेक्स करताना कसा प्रतिसाद देतं, हे कळतं", असं जुदीथ गोल्डन सांगतात. तुमचं शरीरच तुम्हाला काही संकेत देईल, तुमच्या शरीराकडून तुम्हाला जी काही माहिती मिळते, ती तुमच्या जोडीदाराला किंवा जोडीदारणीला स्पष्टपणे सांगा. गोल्डन म्हणतात की, "तुम्ही पोर्नोग्राफीवर किंवा हस्तमैथुनावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या जोडीदारा तुमच्या इच्छेनुसार सेक्स करणं कठीण जातं. त्यामुळे तुम्हाला हस्तमैथुनातून ऑर्गेझमन मिळत असेल तर जरूर करा", असाही सल्ला गोल्डन देतात.
झोप चांगली लागते
तुम्हाला रात्री झोपच लागत नसेल किंवा निद्रानाशाचा आजार असेल, तर झोप येण्यासाठी हस्तमैथुन तुम्हाला मदत करते. हस्तमैथुन केल्याने त्वरीत झोप लागते. गोल्डन म्हणतात की, "तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर सेक्स केल्यानंतर शांत झोप लागते. कारण, सेक्स करताना ऑर्गेझम मिळण्याच्या वेळी हृदयाची धडधड वाढते आणि रक्तदाब जास्त असतो. एकदा ऑर्गेझम मिळत असताना मेंदूत तयार झालेल्या एडाॅर्फिनमुळे आपल्याला रिलॅक्स वाटते आणि चटकन झोप लागते. त्याचपद्धतीने हस्तमैथुन केल्यानंतरही चांगली झोप लागते.
अधिक वाचले जाणारे…
सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती?
'या' ५ सेक्सी घटनांमुळे जगाच्या इतिहासच बदलला!
'या' माॅडेलचे सेक्सी फोटो पाहून इंटरनेटदेखील झाले हॅंग!