थायलंडमध्ये स्कूल बसला लागलेल्या आगीत 25 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत File Photo
आंतरराष्ट्रीय

थायलंडमध्ये स्कूल बसला भीषण आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून अंत

Thailand School Bus Fire | स्कूल बसमध्ये एकूण 44 लोक होते

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: थायलंडमध्ये स्कूल बसला लागलेल्या आगीत 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीनुसार, बसमध्ये 44 लोक होते. त्यापैकी 16 जणांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू असून, आग लागलेल्या बसमधून उर्वरित विद्यार्थी आणि शिक्षकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

बस सहलीवरून परतत असताना भीषण दुर्घटना

मात्र, बसचा टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार, बँकॉकच्या खु खोत परिसरात मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळेच्या सहलीवरून परतत होती, तेव्हा बसला भीषण आग लागली. स्कूल बसमध्ये ३९ विद्यार्थी आणि ५ शिक्षक असे एकूण ४४ जण प्रवास करत होते.

3 ते 15 वर्षे वयोगटातील मुले, ५ शिक्षकांचा समावेश

बसमध्ये 3 ते 15 वर्षे वयोगटातील मुले होती. याशिवाय त्याच्यासोबत ५ शिक्षकही प्रवास करत होते. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, बसचा चालक फरार असून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT