Ayman al-Zawahiri 
आंतरराष्ट्रीय

‘अल-कायदा’च्या म्‍हाेरक्‍याने केले भारताचे कौतुक!

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्‍हाेरक्‍या अल-जवाहिरीने काश्मीरबाबत एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्‍ये त्‍याने मोदी सरकारd; जम्‍मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल कौतुक केले आहे.अल-कायदाचा प्रमुख अल-जवाहिरीने ४७ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काश्मीरची पॅलेस्टाईनशी तुलना करत भारताच्या समर्थनासाठी मुस्लिमांचे राज्य असलेल्या अरब देशांवर टीका केली आहे.

' अल जवाहिरी ' जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी

अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अल-कायदा संघटनेचा म्‍हाेरक्‍या अल-जवाहिरीने काश्मीरचा संदर्भ देत व्हिडीओ संदेशात एक लांबलचक भाषण दिले आहे. व्हिडीओमध्ये अनेक ठिकाणी काश्मीर आणि पॅलेस्टाईनची छायाचित्रे दाखवण्यात आली असून, त्यात राजकारणी आणि लष्करही दाखवण्यात आले आहे.

यूएई-सौदी अरेबियाचा निषेध

अल-जवाहिरी यांनी जम्मू आणि काश्मीरची तुलना कलम ३७० रद्द केल्याच्या कारणावरून जेरुसलेमच्या इस्रायलला जोडण्याशी केली आहे. ताे म्हणतो की, भारत सरकारचा काश्मीरला जोडण्याचा निर्णय म्हणजे मुस्लिम देशांवर राज्य करणाऱ्या मुस्लिम सरकारांच्या तोंडावर चपराक आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर मोदी सरकारला पाठिंबा दिल्याबद्दल अल जवाहिरीने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती सरकारवर टीकाही केली आहे.

काश्मीर खोऱ्यात सक्रिय

गेल्या काही वर्षांपासून अल-कायदा संघटना काश्मीरमध्ये सक्रिय आहे. अल-कायदा वेळोवेळी काश्मीरबाबत व्हिडीओ संदेश जारी करत असते. २०१७ मध्ये, अल-कायदाने काश्मीरमध्ये अन्सार गझवत-उल-हिंद नावाने एक सेल सुरू केला होता, जो झाकीर मुसाने हाताळला होता. झाकीर मुसा हिजबुल मुजाहिद्दीनला सोडून अल-कायदाला मिळाला होता. झाकीर मुसा आणि बुरहान वानी यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता ज्यात ते आदिल दारची जोरदार प्रशंसा करताना दिसत होते. आदिल दार याने  स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या बसवर घुसवली होती, या हल्‍ल्‍यात  सीआरपीएफचे ४०जवान शहीद झाले हाेते.

हेही वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT