सिंगापूर, टोकियो; वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबाद येथील शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी इराणी बंदरांवर जाणार्या जहाजांवर नाकेबंदी जाहीर केली. या नाकेबंदीच्या पहिल्या पूर्ण दिवशी मंगळवारी होर्मुझ सामुद्रधुनीतून इराणशी संबंधित तीन टँकरनी होर्मुझमधून प्रवास पूर्ण केल्याचे शिपिंग डेटा सांगतो.
अमेरिकेच्या नाकेबंदीचा फक्त इराणी बंदरांवर जाणार्या किंवा तेथून येणार्या जहाजांवर परिणाम होणार आहे. सध्या होर्मुझमधून जाणारी तिन्ही जहाजे इराणी बंदरांशी संबंधित नसल्याने ती या नाकेबंदीच्या कक्षेत येत नाहीत, असे अमेरिकेने सांगितले. पनामा ध्वज असलेले मीडियम रेंज टँकर पीस गल्फ हमरियाह बंदराकडे (यूएई) निघाले आहे. हे टँकर सामान्यतः इराणी नाफ्था इतर मध्यपूर्व बंदरांवरून आशियाकडे निर्यात करण्यासाठी वापरले जाते.
अमेरिकेच्या निर्बंधित मर्लिकिशन (पूर्वीचे नाव ) टँकर 16 एप्रिलला इराकमध्ये फ्यूल ऑइल लोड करण्यासाठी निघाले आहे. यापूर्वी हे रशियन आणि ईरानी तेल वाहतूक करत होते. रिच स्टॅरी हे टँकर होर्मुझमधून बाहेर पडणारे पहिले जहाज ठरले आहे. हे सुमारे 2.5 लाख बॅरल मेथेनॉल घेऊन यूएईच्या हमरियाह बंदरावरून निघाले आहे. हे चीनचे मालकीचे आहे आणि त्यावर चिनी कर्मचारी आहेत. अमेरिकेने रिच स्टॅरी आणि त्याच्या मालक कंपनी शांघाय शनरन शिफिंग कॉर्पोरेशनवर इराणशी व्यवहार केल्याबद्दल निर्बंध लादले आहेत.